Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्रद्धेचे वसतीस्थान ©️

श्रद्धेचे वसतीस्थान ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

श्रद्धेचे वसतीस्थान जे आहे ते शुद्ध असेल तर भावना शुद्ध राहील. श्रद्धेचे स्थान जे शुद्ध असावे लागते, ते भक्ताजवळ नसेल तर भावना शुद्ध राहू शकेल का? श्रद्धेचे जे वसतीस्थान आहे ते जर शुद्ध नसेल, भावना शुद्ध राहू शकणार नाहीत. श्रद्धा आहे पण ती कशी, आम्हाला काळजी नाही, आपले बाबा आहेत, काहीही जरी झाले तरी ते बघतील. काही प्रसंग आल्यावर हाक मारल्याबरोबर सद्गुरु येतील. आम्हाला प्रसंगातून सोडवतील, आमचे सांत्वन करतील,

माझे बाबा किंवा माझे सद्गुरू मला बिकट प्रसंगातून सोडवतील अशी सेवेकऱ्यांना खात्री असते. त्यांची श्रद्धा असते. परंतु सेवेकरी हा विचार अडचणीच्या वेळेला करतो. हा त्याचा भाव त्याच्यावर प्रसंग आल्यानंतर असतो. परंतु सेवेकर्‍यांनो तुम्हीच सांगा यासाठीच केवळ शक्ति आहे का?

आपण पाहतो आपल्यात काही ज्योती, काही सेवेकरी असे आहेत की त्यांची मुलेच त्यांना दाद देत नाहीत, त्यांची मुले त्यांचे ऐकत नाहीत. अर्थात सद्गुरूंचे हे कर्तव्य आहे की अशा सेवेकऱ्यांना शांत करणे, त्यांचे सांत्वन करणे, कारण जर सेवेकऱ्याचे मन बेचैन झाले तर भक्ती होणे शक्य नाही. ©️

You cannot copy content of this page