Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

आंधळ्याशी जग…©️

आंधळ्याशी जग…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज

अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पहातच आहात, अनुभवत आहात, गेली तीस वर्षे अघोरांचा नाश करीत आलो आहोत.

स्थुलातून गेलेल्या त्या अघोरांनी, सूक्ष्माने मानवावर कब्जा केला. द्वापार युगापासून जेवढे अघोर अवतारकार्यात मारले, ते सर्व अघोर सूक्ष्माने होते. सूक्ष्माने ते कार्य करीत होते. गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना शक्य होईल का? ज्यांच्यासाठी ॐकारांना जन्म घ्यावा लागला, ज्यांच्याकरिता अनंतांनी ॐकारांना आदेश देऊन जन्म घ्यायला भाग पाडले अन त्यांना कर्तव्याची दिशा दिली, मग अशा अघोरांच्या सूक्ष्माचा नाश तुम्ही कलियुगी मानव करू शकाल का?

आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य अशा ८५० पायऱ्यांच्या अघोर ज्योतींचा देखील नाश केला गेला आहे. सर्वस्व ह्या राक्षसांकडे होते, ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र अशा देखील अघोरी ज्योतींचा या शुद्धीकरणातून नाश केला गेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे, आंधळ्याशी जग सारेची आंधळे।..©️

You cannot copy content of this page