Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

परमेश्वर वेगळे तत्व आहे का? २©️

परमेश्वर वेगळे तत्व आहे का? २©️

आकार हा तत्त्वाच्या रहित आहे का? मग तत्त्वाने आकार पोसला गेला की आकाराने तत्व पोसले? मग आपणाला काय पाहिजे? तत्व पाहिजे का? यामुळेच सेवेकरी फसला जातो.

सत् हे आकारी आहे अन् आकारा रहित पण आहे. जर आपणाला त्रिगुण रहित पाहिजे असेल तर त्याप्रमाणे वाटचाल करणे. माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे बोल अन् सताचे बोल यावर लक्ष ठेवा. काही सेवेकऱ्यांना सताचे बोल कसे ओळखावे याची कल्पना नाही. आपण ज्या आकाराला शरण आहात, त्याच्याच आवाजाप्रमाणे आवाज ओळखणे. हेच सताचे बोल ओळखावेत.

सर्वांना अन्न पाणी देणारे, पोसणारे हे एकच तत्व आहे. ते सर्वभूतेषु पश्य आहे. आम्हाला कशासाठी पाठविले आहे? आम्हाला सुद्धा कानपिचक्या मिळतात. त्या कोणाला? तर प्रकृतीला, तत्त्वाला नाही. म्हणून होता होईल तेवढे चुकण्याचा प्रयत्न करू नका.

सद्गुरु ! सद्गुरु ! सद्गुरु म्हणजे तरी काय? अन् हे कसे आहेत? सत् आणि गुरु ! सत् सोडून गुरु ही दोन अक्षरे आहेत. सताला आकार नाही. गुरुला आकार आहे. पुढे संस्कृत श्लोकच आहे –

गुकारो प्रथमो वर्णा, मायादी गुण भासका | सकारम् द्वितीय ब्रह्मा | माया भ्रांती विमोचक: ||

म्हणून जे सत् आहे, तेच पूर्ण प्रकाशात फेकतात, अन् ते सुद्धा आकाराला धरूनच ! म्हणून आकारातच ते तत्व आहे. कारण ते आकार अन् निराकार एकरूप झालेले असतात. ते अन् हे वेगळे नाहीत. म्हणून आकाराचीच पूजा केल्याशिवाय हे काही एक (निराकार) मिळणार नाही. ज्या आकाराला आपण शरण आहात, त्याच आकाराला ओळखावे. हे सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे. अन् आकाराच्या ठिकाणी तुम्ही पूर्णत्वाने ठाम आणि श्रद्धायुक्त असाल तर मग ओळखण्याची आवश्यकता नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page