Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री कृष्ण जयंती संदेश २©️

श्री कृष्ण जयंती संदेश २©️

सेवेकरी ठाम आहेत. जे होणार आहे, ते कधीही चुकणार नाही. जी घडण घडणार असेल, ‌ ती घडल्याशिवाय राहणार नाही. सर्वत्र अघोर, आप मतलबी, वाईट वर्तणूक, गरीबांकडे दुर्लक्ष, स्वतःचा स्वार्थ साधूपणा याला ऊत आलेला आहे. या अघोरांनी जास्त थैमान घातलेले आहे. याची घुसळण केल्याशिवाय काही होणार नाही, या मानवांकडून काहीतरी पाप घडल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून हे असे होत आहे.

आता काळ नजीक आलेला आहे. पुढे काय होणार हे मी सांगत नाही अन् सांगणारही नाही. आपण पाहत राहणे. कृष्णाने कंसाशी तसेच इतर अघोर मानवांची जसी घुसळण केली त्याच तऱ्हेची गती आता होणार आहे. नैसर्गिक गतीकडून ते करून घेणार आहे. त्याचप्रमाणे मानवी कृती कडूनही घुसळण होणार आहे. आपल्या दृष्टीसमोर सर्वस्व खेळ असेलच. मानव कसा चालला आहे हे आपण पाहतच आहात.

अघोरांची घुसळण झाल्यानंतर भूमी शुद्ध करण्यास वेळ नाही. भूमी शुद्ध झाली की उ:षापाचे काय करायचे ते आपणास माहित आहे.

आपल्या कर्तव्यात जागृत राहणे. रामावताराच्या वेळी मानवांची बुद्धी व कृती ज्या गतीची होती त्याप्रमाणे माझी तऱ्हा होती. त्यावेळेला एक बोल एक वचन अशी तऱ्हा होती. पण तदनंतर काळ बदलला. कृष्णावताराच्या वेळी काळ कसा होता? याची टोपी त्याला घाला त्याची टोपी याला घाला. हे कोणासाठी केले? भारतात सगळेच भक्त होते. कंस हा भक्तच होता. त्याच्या सानिध्यात भक्तच होते. वासुदेव देवकी हे सुद्धा भक्त होते. मग यांना वाचवून कंसाचा नाश करण्याची काय आवश्यकता होती? म्हणून ज्या ठिकाणी सतशुद्ध भक्ती असते, तेथे मला काही करता येत नाही. सत् असून सुद्धा अधोगतीला गेल्यानंतर नजर फिरवावी लागते. अवतार कार्य केंव्हा, कधी आणि कोणत्या गतीत होते? या भारत भूमीमध्ये अतिशयोक्ती झाल्यानंतर अघोरांचा नि:पात करण्यासाठी काही काळ वेळ नसते. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. सूक्ष्माचे कर्तव्य आहे, तेच फार महान कर्तव्य आहे. कारण या दंडकारण्यातील मानवांना या अघोरी तत्त्वांनी आपलेसे करून घेतलेले आहेत. अशांची सुधारणा कोणत्या तऱ्हेने करावी हे सांगण्याची आवश्यकता नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page