विषय – ‘वि’ म्हणजे काय? आणि ‘षय’ म्हणजे काय? ‘वि’ म्हणजे विश्वकर्ता. षय म्हणजे संशय रहित. न पाहता येणारे असे तत्व. वि याचा अर्थ विश्व आणि विला स्वर लावल्यानंतर ईश्वर ही संज्ञा ! षय म्हणजे सर्व संशयांचा क्षय करणारा !
जो विषय आहे तो अखंड आहे. त्याला कोणी तोडीत नाही. तोडू शकत नाही. कोणी तोडलेला आहे का? आणि तो विषय, त्याचे कुणी वर्णन केले आहे का? माझे वर्णन मी करू शकत नाही. म्हणून या विषयांच्या ध्यानात निमग्न राहणे.
मायावी तऱ्हेने मानवांना थोडीफार का होईना, आर्थिक परिस्थिती पडली, तर सेवेकरी विचारवंत होतो. पण विचारवंत होऊन काय उपयोग? होणार आहे ते होते. परंतु थोडा अवधी जातो.
ज्ञान म्हणजे काय? ज्ञान अनेक तऱ्हेचे आहे. अनेक ज्ञानांच्या पाठीमागे न लागता, सत ज्ञानाच्या पाठीमागे सेवेकर्यांने जाणे. जे ज्ञान गुप्त आहे, ते कोणी काढून घेऊ शकत नाही. असे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पोपटपंची ज्ञानाची काय जरूर आहे? असे ज्ञान सर्व ठिकाणी भरून उरलेले आहे. असे ज्ञान आपल्याला मिळाल्यानंतर मग काय पाहिजे? दुसऱ्या लपंगी, छपंगी ज्ञानाची आवश्यकता काय? (पुढे सुरु….२) ©️
