Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सत्संग-३ ©️

सत्संग-३ ©️

सेवेकर्‍यांनी सत्संग मिळविण्याचा प्रयत्न करावा. साधू, पण साधू कोणता? ऋद्धी सिद्धी साधणारा साधू की सर्वांचे साधून आपलेही साधन करणारा साधू? की जो स्वयमेव आहे तो साधू? जो स्वयमेव साधू आहे, तो सर्व मानवांना, सेवेकर्‍यांना सहाय्य करून आपल्यात रममाण करणारा, एकच चाकोरी, एकच मार्ग दाखविणारा तो साधू होय. माझे-तुझे, मी-तू, काही नाही. सर्व एकच आहे असे दाखविणारा तो साधू ! अशाचा अंत घेणे सेवेकर्‍याचे कर्तव्य आहे. त्यांच्याच चरणात, त्यांच्याच ध्यानात निमग्न राहणे सेवेकऱ्याचे महान कर्तव्य आहे.

चणे खावे लोखंडाचे | तेव्हाच ब्रह्मपदि नाचे || मग ब्रह्मपद अनुभवायचे असेल तर त्याला कसून घेण्याचा माझा अधिकार आहे की नाही, माझे कर्तव्य आहे की नाही? मी माझ्या समान बनविण्यासाठी सेवेकऱ्यांना कसून घेण्याचा मला अधिकार आहे की नाही?

पण हल्लीचा मानव कसाला किती टिकेल, हे मला माहित आहे. कारण, कस घेण्याचा तो काळ गेला. पूर्वीसारखा आता कस नाही. इतर ठिकाणी जे भक्तीचे लोण चालले आहे, ते आपणाला माहित आहे. आव जाव घर तुम्हारा असे हिंदीमध्ये म्हटलेले आहे. काही करा, पण प्रथम गुरुदक्षिणा द्या. अशा काही गुरूपद अनुभवणाऱ्या ज्योती आहेत. त्या ठिकाणी माझा नाईलाज आहे.

जो मानव जे करतो, ते तो आपल्या हितासाठी करतो, मग त्या ठिकाणी मी लक्ष का घालावे? त्याला तो रस्ता पवित्र दिसतो, त्याला मागे का ओढावे? पण जो माझ्या सत मार्गात आहे, तो जर चुकत असेल, तर त्याला लाघव करून मी परत सत मार्गावर आणतो. ज्याला सत मार्गाने जावयाचे व ज्याला सत मार्ग आवडतो त्याचे कोणीही काहीही करू शकणार नाही. पण सेवेकऱ्याने अनेक मार्गांचा अवलंब केला तर त्याला लाघव करून सत् मार्गावर आणीनच ! त्याला चांगला ठोकून घेतल्याशिवाय राहणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page