Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

शुद्ध होण्याचा प्रयत्न करा ©️

शुद्ध होण्याचा प्रयत्न करा ©️

श्री समर्थ मालिक – महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला आहेत हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी काय करतो अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार करणे.

सेवेकऱ्यांनी शुद्ध होण्याचा प्रयत्न करावा. एवढे तरी करा. याच जन्मी कमवायचे असेल तर आत्ताच कमवून घ्या. भंडार भरलेला आहे पण लुटणारा पाहिजे. नाहीपेक्षा त्याचा उपयोग काही नाही.

संचिताची घडण ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे सेवेकर्‍यांना माया मिळते. पण सेवेकऱ्यांना केव्हाही उपाशी ठेवणार नाही. मायेला निर्माण करणारा तुमच्या सानिध्यात असला तर माया म्हणजे काय? माया कोठे जाणार आहे?

इतकेच आहे, बऱ्याच वर्षापासून दरबारच्या सेवेकऱ्यांना संदेश आहेत – एकाच जीवात, एकाच रज्जूत आपण डूंबून रहावे. ही समर्थांची अपेक्षा असते. हेवे-दावे, मनाचा कलुषितपणा, कुणालाही नाराज न करणे, हे आपण आपले समजले पाहिजे. माझा कोणताही गुरुबंधू भगिनी नाराज होऊ नये अशीच मनाची गरज प्रत्येक सेवेकर्‍यांने ठेवली पाहिजे. मन शुद्ध स्फटिकासारखे ठेवले पाहिजे. तरच आत्ताच्या महान कर्तव्याला शोभा येईल. मनामध्ये गढूळपणा ठेवल्याने शोभा येणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page