Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

रुक्मिणी माता ©️

रुक्मिणी माता ©️

रुक्मिणी माता – (आषाढी एकादशी) प्रथमच परब्रम्ह तत्त्वाने, आपण ज्यांना परब्रह्म म्हणता (याच ठिकाणी माझी मान लवते, त्यांनी सुद्धा मान लवविली) मग परब्रह्म कोण? म्हणून माझी कर्तव्य मी करीत आहे. पण एवढेच आहे, जे सर्व भूतेषु पश्य ते सर्व ठिकाणी व्यापक असून सुद्धा अलिप्त आहेत. याची गती मिळण्यासाठी कोणाची तरी साथ हवी असते. साथ मिळाल्यानंतर त्यांची पाठ सोडू नये.

सर्वांनी सांगितले आहे, आकारा शिवाय निराकाराची गती नाही. आकाराला धरले की निराकार जाग्यावर येते.

या ठिकाणी सेवेकरणी आहेत. माझ्या विठ्ठलाला प्रत्येक ठिकाणी मी तक्रार करीत नाही. पतीव्रतेने पतीचे व्रत पाळले नाही तर ती सेवेकरीण कसली? एका महान योगीनीने त्रिगुणांना शरण आणले, तशा आताच्या अनुसया आहेत की नाही कोण जाणे? इतके सांगायचे आहे की, पती हे कोण? त्या ठिकाणी कोण? ते ठिकाण कोणते? या विचारांनी चालले की परब्रम्ह त्या ठिकाणी धावतील.

म्हणूनच सांगितले आहे. म्हणूनच त्या परब्रम्हाचे वर्णन केले आहे, “नाना जन्माचे अवतार | नाना गौत्र विचार ||” तोच विचार तू जाण. त्याला मानव सेवेकरी काय जाणणार? म्हणून मूर्तिमंत हा आकार आहे. अहंकार सोडून वर्तणूक ठेवा.

या आसनाचे जे जे सेवेकरी आहेत त्यांना अनुभव आलाच असेल. मग कर्ता करविता कोण? सद्गुरु कोण? मग तुझे माझे का? सद्गुरु कशाचा लोभ दर्शवितात का? मायावी संसाराचा गाडा सद्गुरुच हाकून घेतात. तुम्ही कोणीही नाही. तो गाडा ते अनंत तऱ्हेने हाकतात. फक्त कृतिमान राहणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. विठ्ठल हेच माझे सर्वस्वाचे निधान आहे. आम्ही एकमेक एकमेकावर अवलंबून आहोत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page