Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

आषाढी एकादशी ©️

आषाढी एकादशी ©️

श्री विठ्ठल – दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वाजवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी? जे सत् तत्व आहे ते भक्ताला कधी सानिध्यात घेतील ते त्यांच्यावर अवलंबून आहे.

मीच सर्वस्वाचे निधान आहे असे नाही. एकमेक एकमेकावर अवलंबून आहेत. आपण प्रत्यक्ष आहात. मी अदृष्य आहे. प्रत्यक्ष स्थूल देही व्यवहार या ठिकाणी आहे. लाखावर यात्रा जरी भरली तरी मला कोणी पाहिले नाही. पाहणारे भक्त गेले. आता या काळात कोणीही नाही. हौसे, नवसे, गवसे हे त्या ठिकाणी गेले आहेत, सत् भक्त म्हणून नाहीत. आपल्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणचे परिवर्तन चालले आहे. मालिक कोणास म्हणावे, हे सुद्धा मला कळेनासे झाले आहे.

आत्ताचा काळ तसा नाही. भाविक भक्त म्हणावे तर ती ज्योत भक्तीतच रममाण झाली पाहिजे. भक्तीत रममाण झाली, तर एवढ्या लांब येण्याची आवश्यकता काय? सेवेकरी देऊन देऊन काय देणार आहे मला? कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का? कोणीही भक्त बिलकुल मागणी न करता परतला आहे का? मग हे भक्त आहेत असे म्हणता येईल का? जे मागायचे ते मागत नाहीत. म्हणून मला त्यांना लवकर दर्शन द्यावे असे वाटत नाही.

एकही भक्त सत् भक्तीत रममाण नाही. जर रममाण झाला असता तर माझी गाठ घेण्याची आवश्यकता वाटली असती. आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे. मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन केले आहे. आदेश देणारे, कार्य करून घेणारे कोणी तरी आहेत. पण ती खूण दाखविणारे आकारी असले पाहिजेत. मग मी आकारी आहे का? (पुढे सुरु….२) ©️

You cannot copy content of this page