Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

आकारीले तितुके नासे | एरवी तत्त्व असे ते अविनाशी || ©️

आकारीले तितुके नासे | एरवी तत्त्व असे ते अविनाशी || ©️

श्री समर्थ मालिक – आकारी ही माया असते. नासे म्हणजे काय? जडत्व फेकून दिल्यानंतर आकार निर्माण करावा लागतो. म्हणजे आकार दृष्य झाला असे वाटते, कोणाला अन् नाही कोणाला? स्थानवंत आहे, त्या अर्थी आकारी आहे. आकारी असून निराकारी आहे त्याचा ठावठिकाणा नाही.

मी कोणीही नाही, मी निमित्त मात्र आहे. असे जरी म्हटले तरी एक तत्त्व यात लबाडी करणारे आहे. म्हणून सेवेकरी बोलतो आणि फसतो. सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे. मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? हे प्रथम शोधले पाहिजे. मन सर्वांगीण शुद्ध ठेवले पाहिजे.

मायेचे सुद्धा बोल पडतात. जर मायेच्या आधीन झाला तर त्याचप्रमाणे त्याला मायेची वाटचाल करावया लावतात. पण माया तरी अंतर लागू देईल का? सेवेकरी मायेच्या आधीन गेला तर माया फसवणारच. पण मायेच्या आधीन गेला नाही तर माया फसवणार नाही. मायेच्या रहित कोणीही नाही. पण त्याला मर्यादा आहे. मायेला मर्यादशील ठेवलीच पाहिजे. नाही पेक्षा माया कोठे चढवील आणि कोठे पाडील याचा अंत नाही. सेवेकऱ्यास वाटत असेल की माझे सताचेच बोल आहेत, पण नाही. याचे शोधन सेवेकर्‍यांने करावयास हवे. हे बोल कोणाचे आहेत, यात चिकिस्तक राहिले पाहिजे. माझ्या सद्गुरूंचे आदेश, संदेश पाळून त्या दिशेने सेवेकरी राहील तर सत् त्याच्यापासून दूर नाही. (पुढे सुरु….२) ©️

You cannot copy content of this page