Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

तत्त्व भिन्न का प्रकृती भिन्न ©️

तत्त्व भिन्न का प्रकृती भिन्न ©️

श्री समर्थ मालिक – || तत्त्व भिन्न का प्रकृती भिन्न ||

मन म्हणजे माया. माया म्हणजे प्रकृती. ते बोल ओळखायला मिळतात. मग सेवेकरी अभिन्न का होत नाही? हेवेदावे, गटबाजी काय आहे हे? जीवाच्या जिवलगाप्रमाणे ह्यांचे एकमेकांशी वर्तन का असू नये?

ज्या ठिकाणी मान अपमान आला, तो सेवेकरी सतात रममाण झाला नाही. त्यांने सताचे बोल ऐकले नाहीत. मान अपमानाला जखडला की हेवेदावे निर्माण होतात. सत् बाजूला असते. ते पाहत असतात. यामुळेच म्हणतात, सेवेकरी सतात रममाण झाला नाही.

जो सतात रममाण झाला, तो मायेचे बोल ओळखून गप्प बसतो. कारण मायेच्या बोलाला तो महत्त्व देत नाही. तो सताचे बोल ऐकण्यासाठी अधीर झालेला असतो. तो मान अपमान हे बघत नाही. तो मायेला जखडून राहत नाही. मनाच्या तरंगाने चालत नाही. म्हणून तो सेवेकरी सुखदुःखाच्या वेगळा असतो.

पण असा जो सेवेकरी आहे त्याची मानव विटंबना करतात. तरी तो सेवेकरी कोणाकडेही पापणी वर करुन पहात नाही. संदेशांचे महत्त्व त्याला कळते. त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. तो सेवेकरी मान अपमानाला जखडला आहे असे म्हणता येईल का? तर नाही. तो सेवेकरी सद्गुरु ध्यानात निमग्न झाला आहे नाही का? आताचे सेवेकरी सांगतात, प्रकृतीचे बोल ओळखतात. पण त्यांना मनाला थोडेसे सुद्धा बाजूला हटविता येत नाही. अभिन्न बनता येत नाही. असे का? (समाप्त)

You cannot copy content of this page