Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

भक्ती साधी अन् सोपी ©️

भक्ती साधी अन् सोपी ©️

गोरा कुंभार – खरे पाहिले तर भक्ती साधी सोपी आणि सरळ आहे, पण ती डोळे भरुन पाहता आली पाहिजे. इच्छा असली तर पाहिल. सत भावनेने वाटेला लागल्यानंतर पूर्व संचिताप्रमाणे मिळेल. नाहीतर कितीही ज्ञान सांगितले तरी त्याचा काही एक उपयोग नाही.

आताच्या काळात बोलणे फार, पण कृतीला कमी. काहीच दिसत नाही. या ठिकाणी काही माणसे पूर्व संचिताप्रमाणे सताच्या ठिकाणी आहेत. त्यांचे भाग्य आहे. माझे पण भाग्य आहे. इथल्या सेवेकऱ्यांनी येथून पुढे तरी याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा.

भक्ती सोपी तेवढीच कठीण आहे. मला काही सांगता येत नाही. या ठिकाणी घसटीने राहिला, तर हक्काने मोक्ष मुक्ती आहे. ज्याला सद्गुरु म्हणतात तेच ईश्वर, परमेश्वर, राम, कृष्ण काही म्हणा, एकच तत्व, अनेक तऱ्हेने नटलेले आहे. आपण सद्गुरु कृपेने पाहतो. त्यांच्याच कृपेने सद्गुरु दर्शन मिळते. आपण आपणात लिन होणे येणे नाम मोक्ष ! त्याला उजेड म्हणा, प्रकाश म्हणा, त्यातच दिव्यरूप प्रगट होऊन दर्शन मिळते, त्यालाच मोक्ष म्हणतात. मग या पलीकडे मुक्ती मोक्ष आहे का? वर्णन करावे एवढे थोडेच आहे.

पूर्वी आम्हाला खोटे बोलणे, चोरी करणे, टिंगल मस्करी करणे हे काहीच माहित नव्हते. विठ्ठलाशिवाय जाणे येणे नाही. त्याच्याच दर्शनात असल्यावर कसली आठवण होते? आता कोणी थापा मारतो, हजारो उलथा पालथी करतो, याला भक्ती म्हणावे काय कळत नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page