Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

कर्मयोग-२-©️

कर्मयोग-२-©️

आदेशाप्रमाणे जन्माला घातला. जन्माला घातल्यानंतर पुढे ज्ञान बिजाचा अंश फेकला जातो. ज्ञान बिजाचा अंकुर फुटल्यानंतर, अशाप्रकारे सतामध्ये रममाण झाल्यानंतर तो सर्वस्व सारख्या दृष्टीने पाहतो. किती जरी मानवांनी त्रास दिला, तरी तो आपले कर्तव्य सोडून दुसऱ्या चाकोरीने जाईल काय? त्याला पूर्ण माहीत होते, हे कोण करते आहे. म्हणून संतांनी सत् चाकोरी कधीही सोडली नाही. हे सत्य आहे ना? सत कर्तव्याला यश हे जरूर येणार. परंतु कोपिष्ट मुनीच्या शापा मुळे वेळ लागला आहे. त्यामुळे सर्वांची मने नाराज झाली आहेत. माझे सुद्धा चुकलेले आहे. काही कारणास्तव हे करावे लागले. याचे स्पष्टीकरण होणारच आहे. मी अदृश्य आहे. सेवेकरी सुद्धा मालिक काय करतात याची सद्गुरू कृपेने जाणीव घेतात. कर्तव्ये पुढे का ढकलली जातात, याची जाणीव घेतात, जाणतात.

या दरबारातील सेवेकऱ्यांनो, आसनाधिस्त सांगतील त्याप्रमाणे वागून आपल्या कर्तव्यात जागृत राहणे हे कर्तव्य आहे. आपल्या भक्तीत रममाण राहणे. आपले पाऊल इकडे तिकडे ढळता कामा नये. सेवा करून घेणारे, कर्तव्य करून घेणारे, सताची वाट दाखविणारे कोण? हे सेवेकऱ्याने ओळखावे. म्हणजे कल्पना रहित झाल्यानंतर त्या सेवेकऱ्याला काही सांगता येत नाही की सत् हेच अखंड आहे की, त्याला खंड आहे. सत् हे स्वयमेव आहे. मग अशा ठिकाणी आपण रममाण झाल्यानंतर अघोर ज्योती, भुत-पिशाश्च सानिध्यात येऊ शकतील का? मग सेवेकऱ्याने विचार का करावा? (समाप्त) ©️

You cannot copy content of this page