श्री समर्थ एकचित्त –
सृष्टी नियमाप्रमाणे जी घडण घडावयाची असते, ती घडवून घ्यावी लागते. कार्य चालू आहे. कालगतीप्रमाणे मागे पुढे होते. त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट झाले, तर वाईटातून सत् प्रेरीत बीज बाहेर पडते. वाईट कृत्य दिसायला दिसते, पण त्यातूनच चांगले पैदास होऊन बाहेर पडते.
कोणतीही घडण घडविण्यासाठी काहीतरी निमित्त काढावे लागते.
एवढेच, असत्याच्या नाशासाठी, सताला थोडी झळ लागते. हे सत्य आहे. पण जी घडण घडावयाची, ती काही अंशी घडवून घ्यावी लागते. “बोलविता धनी”, त्याचप्रमाणे कृती करून घेणारा फार वेगळा आहे. जी घडण घडली, ती कुणामुळे घडली? जी घडण, ती सत्य आहे. पण या घडणीमुळे खालपासून वरपर्यंत हादरे बसले आहेत. जाणीव झाली आहे. थोड्या कालावधीनंतर काय चमत्कार होईल हे आत्ताच सांगता येणार नाही.
दरबार हा दरबार आहे. आसन हे आसन आहे ! ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी दरबार आहे. त्या ठिकाणी आसन आहे. ©️