Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

कर्मयोग ©️

कर्मयोग ©️

कर्मयोग – कर्मयोगातल्या शाखा दोन आहेत – एक सत् आणि एक असत ! विचारणा होते आहे, आनंदाची गोष्ट आहे. संतांनी लिखाण करून ठेविले आहे – सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वां मुखी मंगल बोलवावे !

सध्याच्या युगात कोणी सेवेकरी असा झाला आहे का? भारतातील सर्व मानव सत्कर्म योगाने युक्त असते तर, भारताची ही स्थिती झाली नसती. म्हणून जन्माला घातल्यानंतर प्रथम धर्माची व्याख्या होते.

धर्म म्हणजे काय? त्या धर्माच्या शाखेतून पार पडल्यानंतर, त्याच्यापुढे दोन कर्तव्ये असतात. त्यापैकी तो कोणत्या शाखेने जाईल, हे त्याचे तो जाणे. यालाच सत्कर्म योग म्हणतात.

जर सत मार्गी चालला, तर जन्मोजन्मी सत् मार्गीच जाणार. त्याची जर घालमेल झाली तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असे कितीतरी वेळा त्याला जन्मास पाठवावे लागते. पूर्णात पूर्ण मिलन झाल्यानंतर जन्म घेणे नाही. म्हणून ज्ञानेश्वरा सारख्या महान संतांनी वाक्यरचना केली, त्याप्रमाणे सेवेकरी होईल तर आज त्याला सत्कर्म योग म्हटला आहे. (पुढे सुरु….२) ©️

You cannot copy content of this page