Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सेवेकऱ्याचे वागणे ©️

सेवेकऱ्याचे वागणे ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी दरबारात व दरबाराच्या बाहेर कसा वागतो? तर दरबारात घाबरतो व बाहेर घाबरत नाही. सेवेकरी येथे धीट व बाहेरही धीट पाहिजे. तो म्हणतो, बाहेर तरी मला कोण बोलणार आहे?

येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम आहे, तो कोठेही असो, त्या सेवेकऱ्यास भीती नाही. जे सेवेकरी कर्तव्यासाठी ठाम आहेत, त्यांच्याकडून कर्तव्य करून घेतली जातात वा कर्तव्य करून घ्यावयाचे आहे. कर्तव्यात कसर नको.

संशयातीत सेवेकरी येथे असतात त्यांच्या मनाच्या आत कोण आहे? त्यांच्या मनात संशय असल्यामुळे सेवेकरी घाबरतात. ते अजून बाकी आहेत. येथूनच सर्वस्व घडत असते. सर्वस्व प्रकाशित ज्योती आहेत. पण कशापासून असे होत असते?

आपण एवढे सांगत असता, किती वर्षे इथे आहात, मग यांनी गती घेतली का की, आसनावर काय चालते म्हणून? तुम्हीच पहा आणि सांगा. सर्वस्व मी बोलत असतो.

कृती कृती म्हणजे काय? नामस्मरण होत नाही कारण बसणार कुठे? त्यासाठी बसावयास लागतेच असे नाही. तत्व – त्यामध्ये रममाण होणे गरजेचे आहे. तत्व सोडून ज्ञानी होता येईल का? तत्त्व न सांभाळल्यामुळे ठाम कसे होता येईल? आपली चार तत्वे प्रमुख आहेत – ज्याला ती ज्ञात आहेत, तो माझ्यापर्यंत येत असतो. त्याची ही दृष्टी सर्वत्र सत् सगुण सामावलेली असते. मी कोठे दूर नाही. मी प्रत्येकात रममाण होतो. प्रत्येक ज्योतीत रममाण होणारे हे तत्व आहे. ©️

You cannot copy content of this page