नामाची मूळ उत्पत्ती कशी झाली? मूळ ओंकारापासून ध्वनी निर्माण झाला. त्यातच नाम प्रगट झाले. त्यापासूनच मनुष्य निर्माण झाला. मनुष्याला तारण्यासाठी भक्ती निर्माण झाली. सद्गुरु तारक या पदापासून सर्वस्वाचा उद्धार!
सद्गुरु कसे आहेत? कोणत्या तऱ्हेचे आहेत? त्याची ते ओळख देतात. सद्गुरु नाम देवून आकारी प्रसवले आहेत. आसन कोणत्या तऱ्हेचे आहे? स्थूल, सूक्ष्म कोणत्या तऱ्हेचे आहे, हे दाखवू शकत नाही, ते फक्त सिंहासन करुन दाखविले जाते. म्हणून सेवेकऱ्यानी सद्गुरु चरणांची ओळख करणे ही प्रथम पायरी आहे. हे सर्व कळण्याला नामच कारण आहे. त्या नामाशिवाय गती नाही.
सद्गुरु हे सर्वात, म्हणजे माया, ममता, प्रेम यामध्ये एकत्र झालेले असतात. सत् आणि शांती होण्यास नामच कारण आहे. नाम हे ज्यावेळी शिष्याचा योग असतो, ज्यावेळी त्याची कृती ओघाने येते, त्यावेळी आणि सर्व शुद्धी झाल्यानंतर मिळते. तीच स्थिती शेवट पर्यंत टिकवली म्हणजे सत् शिष्य झाला. आपण सेवेकरी, सगळे सेवेकरीच आहोत.
मनुष्य जीवन कशावर अवलंबून आहे? ते आर्थिक बळावरच तेजस्वी आहे. सत् भक्ती या तत्वात कोणी शिरत नाही. जी भक्ती सत् युगात, तीच भक्ती कलियुगात आहे. मनुष्य कृती संशयाची असल्यामुळे सत् भक्तीचा विसर पडला. सत् भक्ती, सत् पदाने जावयास पाहिजे. सत् भक्तित कोणाचा टेकू आहे हे लक्षात घ्यावयास पाहिजे. सत् भक्ती सद्गुरु चरणात लीन होते.(समाप्त) ©️