Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सत् सेवा – भाग दोन ©️

सत् सेवा – भाग दोन ©️

सेवा आणि सेवेकरी म्हणजे काय? ती कशी करावयाची? सेवेकरी आपल्या सद्गुरूंना देऊन देऊन काय देणार आहे? सद्गुरुनी काय अपेक्षा केली तेव्हा गुरुतत्त्व हे असे आहे त्याचा अंत:पार नाही. त्यांच्या मुखातला एक कण जरी झेलला, तरी तो सेवेकरी भाग्यवान आहे. एकच, गुरुतत्त्व आणि सेवेकरी यांचे महत्त्व पुराण काळापासून या भारतात आहे. त्याचे एक उदाहरण देत आहे.

द्रोणाचार्य, सतपदाचे ऋषीमुनी होऊन गेले. आजच्या शुभदिनी, पांडव प्रताप लिहिला, त्यातील हे एक छोटेसे उदाहरण आहे. द्रोणाचार्य हे गुरु होते. त्यांच्याजवळ अनेक शिष्य विद्याभ्यासासाठी आले होते. त्यात एक सेवेकरी चुकला होता. आपणाला जाणीव आहे, हे उदाहरण का देत आहे? प्रत्यक्ष गुरु मुखातून त्याला संज्ञा दिलेली नव्हती. पण त्याने गुरुतत्त्वाची एक प्रतिमा ठेवून विद्या प्राप्त केली.

याप्रमाणे गुरुतत्त्वात सदैव जागृत राहिले, तरच तो अखंड सेवेकरी होय. कामापुरता सेवेकरी असे नको. या आसनाचा सेवेकरी आतून बाहेरून सद्गुरूमय व्हावयास पाहिजे. (पुढे सुरू…..३)©️

You cannot copy content of this page