Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

बोधप्रद निवेदने (४) ©️

बोधप्रद निवेदने (४) ©️

३१)  महामुनी इंद्रजाल – मालकांशी लबाडी केली. खोटे बोललो. जी वस्तू निषिद्ध ती खाण्यात आली. 

३२)  महामुनी जगदेश्वर – मालकांचे आदेश होते. प्रत्येकाला सत् मार्ग दाखविणे. असत कृती न करणे प्रत्येक गोष्ट सताशिवाय दिसता कामा नये. असे असताना एकाही ज्योतीला सताचे वळण दाखविले नाही. मी ही सत् मार्गाने गेलो नाही. 

३३)  महामुनी चक्रवर्ती – जे सत् कार्य करावयास सांगितले, ते असत्य केले आणि कार्य सत् केले असे समर्थांना खोटे सांगितले. समर्थांचे एक आणि माझ्या मनाचे एक असे समर्थांशी लपंडाव केले. 

३४)  महामुनी ऋषिक – शिस्तीचा भंग करण्यात आला. एवढेच नव्हे तर सेवेकऱ्यांत द्वेष भाव दाखविला.

३५)  महामुनी चतोर – सेवेकरी सेवेकऱ्यांत द्वेष भावनेने वागत होतो. सर्व एकाच माऊलीची लेकरे असताना एकाचीच बाजू उचलून धरली. 

३६)  महामुनी परिक्षा – संसाराचा त्याग करून गेलो. अर्धांगी व दोन मुलें – एक आठ वर्षांचा व एक चार वर्षांचा. त्यांच्या संरक्षणाची कोणतीच तजवीज केली नाही. पिताजी पाठीमागे होते. त्यावेळी हे कळले नाही.

३७)  मुनीवर्य पद्मेश्वर – सर्व सेवेकऱ्यांना एक मार्ग दाखविण्यात आला नाही. एकाला एक आणि एकाला एक असे केले. त्यावेळी मी आसनाधिस्त होतो.

३८)  महामुनी मधुकर – मायावी कर्तव्याला आदेश नसताना स्वतःच्या मनाने कार्य करीत होतो.

३९)  महामुनी कौशिक – जरी महान तप:श्चर्या असली तरी त्याचा काय उपयोग आहे? प्रत्यक्ष मालकांचे आदेश धुडकावण्यात आलेत. त्यांची महती जाणली नाही. म्हणून ही स्थिती अनुभवयास मिळाली. सत् मार्गाने जाण्याचे आदेश होते, ते पाळले नाहीत. सेवेकऱ्यांत द्वेष भाव दाखवायचा नसताना द्वेष भाव दाखविला.

४०)  महामुनी दुलारी – मालकांचे संदेश धुडकावले. मला एक गुणधर्म जडला होता की याची लावा-लावी कर, त्याची लावा-लावी कर. याला चढव, त्याला पाड. ही तऱ्हा करून मजा पाहत असे. ही महान अघोरी चूक माझ्या हातून झाली आहे.

४१)  महामुनी दमकेश्वर – दरबारातील शिस्तीचा भंग करून, मनाला वाटेल त्या तऱ्हेने दरबारात गोंधळ घातला.

४२)  महामुनी एकनाथ – मालकांचे आदेश न ऐकता, मन मानेल त्या प्रमाणे वागलो. आदेशाची महती न बाळगता धुडकावण्यात आले. मानव देहांत असताना एक प्रकारची गुर्मी असते. अहंपणा असतो. माझे कोण काय करणार आहे? पुढचे पुढे पाहता येईल, असे वाटत होते. परंतु, स्थूलातून बाहेर पडल्यानंतर सर्वस्व कळून आले.


४३)  महामुनी गोविंद – दरबारात असताना गुरुबंधूंशी प्रेमाने वागणूक झाली नाही. थट्टा, मस्करी केली. मीच शहाणा अशा तऱ्हेने वागलो. (4) (समाप्त)©️

You cannot copy content of this page