Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

बोधप्रद निवेदने (३) ©️

बोधप्रद निवेदने (३) ©️

२१)  राजयोगी अरुण – मंत्र तंत्र, ऋध्दी सिध्दी याच्या सहाय्याने एका पुरुष ज्योतींची आत्महत्या करण्यात आली. यामुळे ही स्थिती ! आमच्या देखत राम कृष्ण अवतार झालेले आहेत. जे मालिक आहेत, ते पंचमहाभूतांच्या पुतळ्यांत विखूरले आहेत, त्याच्या पलीकडे अकराव्या द्वारात स्थिर होऊन, त्याच्याही पलीकडे ते आहेत. अशा दयाघन शक्तिचे आदेश धुडकावणे किती अघोरी पाप आहे. स्थूलात असताना मीपणात धटिंगणपणा येतो. कोण आमचे काय करणार आहे? पुढचे कोणी पाहिले आहे? असे वाटत होते. परंतु, स्थूलातून बाहेर पडल्यानंतर तो अघोरीचा दाही दिशा बंदोबस्त, त्याच्यात आम्ही, यामुळे पश्चा:त्ताप होत होता.

२२)  महामुनी धर्म – अनुग्रह मिळाल्यानंतर दिलेले आदेश, हुकूम, वळणे, यांचा भंग करीत आलो. म्हणूनच ही स्थिती घडविली.

२३)  मुनीवर्य धन्यु – मालकांनी कोणत्याही कर्तव्यासाठी दिलेले आदेश, हुकुम पाळणे, हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. सेवेकरी म्हटल्यानंतर बंधुत्वाचे नाते येते. त्याचे गोत्र एकच असते. त्याठिकाणी द्वेष दाखवायचा नसतो. पण मी आदेश धुडकावून माझ्या मनाला येईल त्याप्रमाणे वागत गेलो. कार्य करीत गेलो. त्यामुळे ही स्थिती प्राप्त झाली.

२४)  महामुनी मुक्लोष – थोड्या दिवसांनी पूर्वीच्याच वळणावर (असत) गेलो. सेवेकरी सर्व एकच असताना, एकाचीच बाजू उचलून धरीत असे. म्हणजे द्वेष भाव ! त्यामुळे ही स्थिती झाली. 

२५)  महामुनी सिध्दाधन –  मालकांनी दिलेले नियम पाळता आले नाहीत. शिस्तीचा भंग केला. नेहमी थट्टा, मस्करी हेच करीत राहिलो. कडक आदेश सुटल्यानंतर ही परिस्थिती आली.

२६)  महामुनी सुक्रू –  एकच महान चूक झाली, मी कोणीतरी आहे, असा अहंपणा आला.

२७)  महामुनी सुबाक्ष –  मालकांच्या आदेशाप्रमाणे भक्ती न करता द्वैत भक्ती केली. सेवेकऱ्यांत द्वेष भाव दाखविला.

२८)  मुनीवर्य पांगेष –  शिस्तीचा भंग केला. आचरण गढूळ केले. दारू प्यायलो.

२९)  महामुनी पुष्पेश्वर – मालकांचे आदेश धुडकावलेत. घरदार सोडून जंगलात गेलो. तेथे शांती नाही. त्यामुळे ही स्थिती !


३०)  महामुनी कौशल्य – माझी तप:श्चर्या जास्त म्हणून आसनावर बसविले. इतर सत् पुरुषांस सत् मार्ग दाखविण्यास सांगितले. प्रत्येक गोष्ट सतच व्हावयास पाहिजे असे संदेश दिलेत. काही दिवस या मार्गाने गेलो, नंतर इतर सत् पुरुषांवर लक्ष ठेवले नाही. वाटेल ती अंधाधुंदी केली. म्हणून ही स्थिती! (3)©️

You cannot copy content of this page