Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

मन आणि माया ©️

मन आणि माया ©️

मन आणि माया

माया म्हणजे काय? कोणी पाहिले आहे काय?

माया म्हणजे स्वयं पद आणि त्या स्वयं पदाचा प्रकाश !! त्या प्रकाशाला माया म्हणतात. म्हणजे ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश !

त्या प्रकाशात स्थूल मानव पाहतो. तो पाहून त्याला भाळतो आणि जे जे दृष्टीस पडेल, ते ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. ज्या प्रकाशात अमूल्य वस्तू दिसत आहे, त्या वस्तूंपासून आपले संरक्षण होईल अशी मानवाची भावना, म्हणून ती स्विकारण्याचा प्रयत्न करतात.अमूल्य वस्तू खरी, पण तिजपासून पुढे काय होईल याचा विचार नाही, याला माया म्हणतात. माया कोठून आली हे ही याला समजत नाही. मायेला हे कळत नाही की, मी कोठून आले?

ज्योत आणि प्रकाश एकमेकांवर अवलंबून आहेत, हे काहीं सेवेकऱ्यांना कळत नाही. म्हणून एखाद्या सेवेकऱ्याला त्याची जाणीव नाही. म्हणून कोणी कोणाला मोठा अगर लहान म्हणू नये. याचा अर्थ भक्ती आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page