बाबा, मालकांना विचारणा करतांना म्हणतात, “आमच्याही पेक्षा खरा शिव न्यारा आहे. ते कसे? आम्हाला थोडेसे सांगा !
समर्थ म्हणतात, “स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी आहे. स्वयंभू हे भोळे आहेत. त्यांची कोणी भक्ती केली किंवा काहीं विचारलं सवरलं म्हणजे ते झटदिशी वचन देतात. त्यांना मागचा पुढचा विचार नाही. ते नेहमी ध्यानस्थ बसलेलें असतात. त्याला मानव तप या नावाने ओळखतात. स्वयंभूच्या तपाचा कोणी भंग केला म्हणजे ते झटदिशी शाप देतात, परंतु स्वयंभूना विचार नाही. जरी त्यांचे भक्त असले तरीही ते त्यावेळी ओळखत नाहीत. लगेच तिसरा नेत्र उघडून शाप देतात. मग त्या शापाचे काय होते ते स्वयंभू ना कळत नाही.मानव त्यांना भोलेनाथ म्हणतात. स्वयंभूची भक्ती करणारे व इच्छा तृप्त करुन घेणारे, असे या जगात जवळ जवळ १७ टक्के लोक आहेत. परंतु त्यांची जाणीव त्या मानवाना नसते.
स्वयंभु ना निर्माण करणारा कोणीतरी आहे. परंतु मानव कबुल करु शकत नाहीत. स्वयंभू झटदिशी वचन देतात. इच्छा तृप्त करतात, म्हणून त्या मानवाना वाटते की स्वयंभू हेच साक्षात ईश्वर आहेत. परंतु त्यांची जाणीव घेणारे या जगात थोडे आहेत. काही उलट तंगड्या करणारे पण थोडे आहेत. स्वयंभू आले त्या वेळी सेवेकऱ्यांनी जाणीव घेतली होती का? स्वयंभू बरोबर कोण आले होते? (आपणच) आणखी कोण आले होते? ©️