Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

अलख…… प्रवचन (२) ©️

अलख…… प्रवचन (२) ©️

आपला मार्ग कोणता? नाम कोणी दिले? कोणाच्या नामात दंग? ते सद्गुरू कोणते? याची पाहणी करण्याकरीता त्यांच्यात दंग असावयास पाहिजे. मालिक जाणीव देतात. पण सेवेकरी ऐकत नाही. 

       मालिक सांगतात ते हिताचेच सांगतात, मग सेवेकऱ्याने असे कां करावे? माया सर्वांना आहे. ज्याच्या पाठीशी अखंड तत्व, त्याला माया काय करणार आहे? ज्याच्या पाठीशी (ते) नाहीत, त्याला माया कबजा करते. आचार, विचार, कृती सर्वस्व सत् मनानें शुद्ध असल्यावर मायेचे काही चालत नाही. मग सर्वस्व शुध्दच राहते. जरा अशुद्धपणा आला, मनानें गढूळ झाला, तर सर्वस्व गढूळ होते. 

       आपणाला पुष्कळ वेळा सांगितले आहे की, दिवसातून तीन वेळा मालकांची फेरी असते. काहींच्या घरी वादविवाद चालू असतात. मालकांना त्याठिकाणी थांबावे असे वाटत नाही. ते कां? मग, तू आणि अहंपणा यांच्यामुळे कां? तू काय बरोबर घेऊन आला आहेस? तर गेल्या जन्मांचे संचित! मग माझे तुझे कां म्हणावे? हे कोणाचे आहे? 

       हा संसार सद्गुरुंचा आहे. सर्व त्रिभुवनाचा संसार एका ठिकाणी बसून पहात असतात. हे सेवेकऱ्यांनी समजावयास पाहिजे. संसाराला रित पध्दत असते. संसाराची दोन्ही चाके सरळ असतील, वरचे सामान सरळ असेल, तर संसार गाडा सुरळीत चालेल. तिचे चाक सरळ नसल्यास संसार गाडा डळमळीत होऊन सामान पडून जाईल. हे समजावयास पाहिजे. माझे तुझे काय आहे? काय बरोबर नेणार आहे? काय घेऊन जाणार आहे? ते सेवेकऱ्यांनी समजावयास पाहिजे. कांहीना हे समजत नाही. वाटेल तसे, वाटेल त्या वेळी स्वतःशी व इतरांशी बडबडतात. सेवेकरी काय करतात? सांगितले काय आणि सेवेकरी करतात काय? मालिक म्हणतात, करतो तर करु द्या! सांगून ऐकत नाही. त्यांचे कर्मसंचित तो भोगील. ©️

You cannot copy content of this page