मानव हा मायेत गुरफटलेला आहे. त्यातून सुटका कशी होईल हे समजण्यासाठीच या दरबारची निर्मिती आहे.
चार दिशेला चार दरबार आहेत. अशा तऱ्हेचा उत्सव अनेक ठिकाणी आज होत आहे. परंतु हा स्वयं दरबार आहे. या ठिकाणी एक क्षण का होईना, प्रयत्न करने हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी अखंड तत्व प्रगट आहे. ते प्रगट आहे किंवा नाही, ह्याची प्रत्येकाने पाहणी करावी आणि ज्यांनी या तत्वाची जाण घेतली तेच खरे सत् शिष्य ! तेच खरे सत् भक्त होत !
या ठिकाणच्या तत्वाची, येथील घडामोडींची जाणिव घेण्याचा प्रयत्न करा. हा स्वयं दरबार आहे. चार दरबारचे सेवेकरी या ठिकाणी सूक्ष्माने आले आहेत. ते पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी प्रत्येक मानवाने धडपड केली पाहिजे. या ठिकाणी काय चालले आहे, ह्याची एका क्षणाकरीता का होईना जाण घेणे हेच मानवाच्या मुख्य कर्तव्याचे मुख्य अंग आहे. आपण कोण ह्याची जाणीव घेणे, स्वस्वरुप दर्शन घेणे आणि त्याचबरोबर आपल्या आद्य कर्तव्याची जाणीव ठेवून सद्गुरु चरणांत रममाण होणे, त्यांच्याच स्वरूपात लय होणे. अशा तऱ्हेने पायरी पायरीने त्यांच्या ठिकाणी तेच नेऊन पोहचवितात. त्यांच्या कृपेशिवाय, त्यांच्या सानिध्याशिवाय त्यांच्या ठिकाणी कोणीही जावू शकणार नाही. ©️
(समाप्त)