Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सद्गुरु दर्शन, मुक्तीचा मार्ग ! ©️

सद्गुरु दर्शन, मुक्तीचा मार्ग ! ©️

अलख – तुम्हीं प्रथम आपल्या गुरूंचे दर्शन मिळविले तरच पुढे मार्ग मिळेल. गुरू दर्शन सोपे नाही. गुरू दर्शन हाच शेवट मुक्तीचा मार्ग आहे. ज्याने मिळविले, तो धन्य होय. त्यानेच मानव जन्मात येण्याचे सार्थक केले असे होईल.

मानव हा कसा असतो? त्याला माया हवी असते. कितीही वळण घालण्याचा प्रयत्न केला तरी तो आपल्या तालातच असतो. मानवाचे मन तालात असते. तेच जर शुद्ध असेल, तर दाही इंद्रिये ताब्यात येतील. तेच जर गढुळ झाले तर सर्वस्व गढुळ होईल. काही सेवेकरी असत मार्गाला जातात. त्यांना मालिक, लिला, लाघव करून, जाग्यावर आणतात. ते का? तर असत मार्गानें जावू नये म्हणून!

पूर्वी आर्यवर्तात गुरुकुलांत जी मुलें शिकत असत. त्यांना एवढी वळणे नव्हती. एकच धडा देत असत. तो करीत ते बसत. या ठिकाणी कितीतरी पटीने ज्ञान मिळते. सर्वस्व सांगण्यात येते. तरी सेवेकरी करीत नाहीत. ह्या मार्गाने जात नाहीत. पूर्वी एकच धडा देवून नाना तऱ्हेने त्याचा कस घेतला जात असे. त्या कसाला ते उतरत असत.

आता काळ नवीन आहे. मानवांच्या मनाप्रमाणे नवीन आहे. मानवाच्या मनात अविनाशी आत्मा जागृत नसेल, तर मानव काय करणार? जागृत म्हणजे कसा? त्यानें जर कृपादृष्टीने पाहिले नाही, तर चलन वलन कसे होईल? म्हणून जागृत म्हटले आहे. ©️

You cannot copy content of this page