श्री समर्थ मालिक –
एकदा सेवेकरी झाला की सेवेकऱ्याचे घर हा सद्गुरु आश्रम आहे.
कृती तशी फळे हा सिद्धांत आहे. सद्गुरु अंत:र्यामी असतात, पण कर्तव्य हे मन करीत असते. मनाचे अनुरोधाने केलेले कर्तव्य हेच कर्मसंचित आहे. तन, मन, धन अर्पण केल्यानंतर जे अविनाशी राहातात, तेच शिल्लक असतात. तेच अक्षय, अखंड आहेत. तेच सेवेकऱ्यांनी जतन करावयाचे असते.
सेवेकऱ्यांने स्वतःचा अनुभव स्वतःच घ्यायचा असतो. अनुभव घेत जे सिद्धत्व, तेच सत असते. सेवेकर्यांनी द्वैतभावना घ्यावयाची नाही.
सेवेकऱ्यांना शुद्धीवर आणण्याचा अधिकार सद्गुरूंचा आहे, सेवेकऱ्यांचा नाही. (कारण सेवेकरी हे सताचे सेवेकरी आहेत, कोण्या मानवाचे ते सेवेकरी नाहीत.) सताचे सेवेकरी हे सद्गुरूंच्या कुटुंबातील गुरुबंधू भगिनीं होत, म्हणून त्यांनी गुरुबंधू भगिनी सारखेच राहावे, सद्गुरुंचे अधिकार आपल्या हातात घेऊ नयेत.©️