संदेश
हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व तो कितपत आहे हे सांगता येणार नाही. ज्यावेळेला चत्वार खाणींची निर्मिती झाली, त्यात मानव हा श्रेष्ठ प्रतीचा आहे. त्याच्याकडे एकच तत्व देऊन ठेवले आहे, ते म्हणजे सरस्वती ! त्याचा त्याला उपयोग करता येत नाही. तेव्हा ती असून नसून फोल आहे. सरस्वतीचा उपयोग कुठे व कोणत्या तऱ्हेने करावा याची जाणीव देणे. सेवेकर्यांनी सरस्वतीचा उपयोग दुष्ट कर्तव्याला बळी पडण्यासाठी करू नये व बळी पडू नये हे संदेश आहेत. याबाबतीत आसनाला पूर्णत्व अधिकार आहेत. मानव अधोगतीच्या मार्गाने जात असतील, तर आपले जे नियम आहेत, साम-दाम-दंड-भेद याप्रमाणे कर्तव्य करणे. नाहीतर पुढची तर्हा वापरण्यास हरकत नाही.©️
