Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री स्वयंभू संदेश ©️

श्री स्वयंभू संदेश ©️

श्री स्वयंभू मी त्रिगुनातीत असणारे एक तत्व आहे अन् अखंड तत्त्वाचा सेवेकरी असून त्यांच्या चरणाचा एक कण आहे. जे स्वयमेव तत्व आहे की ज्याला कधीही खंड नाही. त्याला रात्र नाही आणि दिवसही नाही. वेळ काळ काही नाही असे जे परम तत्व आहे, त्या तत्त्वाच्या चरणांजवळ मी एक कण आहे.

त्रिगुण तत्वे त्यांनीच निर्माण केलेली आहेत. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ही तत्त्वे त्यांनीच निर्माण केलेली आहेत. स्वयंभू याचा अर्थ असा की, ज्यांनी सर्वस्वाला निर्माण केले ते तेच स्वयंभू आहेत.

समुद्रमंथनाच्या वेळी १४ रत्ने निघाली. त्यामध्ये विष हे एक निघाले. निर्माण झाले. ते कोणीही घेण्यास तयार झाले नाही. सगळ्यांनी चांगल्या चांगल्या वस्तू उचलल्या, पण हे कोणीच घेतले नाही. तेव्हा, काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा ते विष मी स्वतः घेतले अन् ते प्राशन केल्यानंतर काय स्थिती झाली, काय हाल झालेत ते माझे मलाच माहित. ही माझी हाल अपेष्टा थांबेनाशी झाली तेव्हा मग त्या समर्थांनी, सद्गुरुंनी मला शांतता दिली. मग मी जर स्वयंभू असतो, तर ते विष मला जिरवता आले नसते का?

मी जरी तर्पट असलो तरी सत तत्वासाठी भोळसट आहे. माझे काही भक्त असतील, काही विष्णूचे तर काही ब्रह्मदेवाचे असतील, पण जसे प्रकृतीचे अंग त्याप्रमाणे वर्तणूक असते. ©️

You cannot copy content of this page