Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

श्री विठ्ठल प्रवचन ©️

श्री विठ्ठल प्रवचन ©️

श्री विठ्ठल – सर्व ठिकाणी व्यापक असणारे तत्व, त्याचा अंत नाही. आम्हा सारख्यांना काही अधिकार बहाल करून कर्तव्यासाठी पाठविले आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्य प्रविण असतो.

सत् हे सामान्य तत्व नाही. सहज बोलतील. सहज बोलणे हाची उपदेश, पण घेईल त्याला. मग त्याला काही एक कमी पडणार नाही. न घेईल तो रिकामा घडाच समजा.

विठ्ठल हे एक आकारी तत्त्व आहे. आदेशाप्रमाणे त्यांनी फेकलेले आहे. ते कशासाठी? मानवांना भक्तीचे वळण लागावे, त्यांनी सत मार्गाने जावे याच हेतूने आम्हाला येथे पाठविले आहे. सत् भक्तांची अतिशय तळमळ असते, त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने दर्शन द्यावे लागते. भक्तांना बोल गेले, ती वेळ निघून गेली आहे. म्हणून परम निधान एकच सत् आहे. या पलीकडे दुसरे कोणीही नाही. मात्र जो पारखी आहे, त्यालाच हे कळेल. इतरांना काही कळणार नाही. (पुढे सुरु…२) ©️

You cannot copy content of this page