Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

श्री ज्ञानेश्वर माऊली….. प्रवचन (१) ©️

श्री ज्ञानेश्वर माऊली….. प्रवचन (१) ©️

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी !
तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!

   मानवाला चार अंगे आहेत - स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण !  या चारही देहातून तो उद्धार करू शकतो. केव्हा? तर ज्या ठिकाणी शरण जायचे, त्या ठिकाणी तो पूर्णत्व शुद्ध पाहिजे. द्वैत भावना, संशय, कल्पनारहित जो असेल तोच सत् पाहू शकेल, इतरांस तो अधिकार नाही. 

   हल्लीच्या मानवांनी  याचे विवरण केलेले दिसत नाही. 

   देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! याचा अर्थ असा नव्हे की, गळयात माळ घातली की तो गुरु झाला. मग त्याने पंढरीला जाण्यास सांगावे आणि विठ्ठलाच्या दारी जाऊन, तेथें उभे राहून आळवण्यास सांगावे. परंतु पंढरीतच देव आहे का? पंढरीला गेल्यानेच देव भेटतो कां? तर असे नाही. 

   पंढरीच्या विठ्ठलाचे तत्व सताने निर्माण करून येथे कार्याकरीता पाठविले आहे. 

   जर विठ्ठल मानवाला मोक्षाप्रत नेऊ शकेल असे जर आहे, तर नामदेवांना गुरु करण्याची आवश्यकता का भासावी? तर मोक्षाप्रत जाण्यासाठी श्री गुरू, सद्गुरु माऊली हेच सर्वस्वाचे निधान आहे. हेच सर्व ठिकाणी व्यापून अलिप्त आहेत..... पुढे सुरु ©️

You cannot copy content of this page