Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्रीराम प्रभु-संदेश ©️

श्रीराम प्रभु-संदेश ©️

उ:शापाचा काळ समीप आला आहे. मानवी शुद्धीकरण वाट पहात आहे.‌ त्याला एकदा गती मिळाली की मग पहा काय होते ते? मानवी शुद्धीकरणाचे कार्य आसनालाच करावे लागेल. तेच मालिक, एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. कृष्णावताराच्या वेळी विचित्र तऱ्हा, विचित्र जबाबदारी असताना कधीही नाराजी पत्करली नाही. म्हणून कर्तव्याला नाराज होऊ नये. कर्तव्य करीत राहणे. मी प्रत्येक सेवेकऱ्याच्या पाठीमागे आहे. मानवी शुद्धीकरण करून घेणारा मी आहे. प्रत्यक्ष मी जर सेवेकऱ्यांच्या पाठीवर आहे, मग निसर्गाला त्याची जाणीव नाही का?

या आसनाचे कर्तव्य फार उज्वल तऱ्हेने चाललेले आहे. या आसनाच्या सानिध्यात जे सेवेकरी आहेत, ते महा भाग्यवान आहेत. त्यांना मार्गदर्शन करा. आज मी रामस्वरूपी उभा आहे. प्रत्यक्ष मारुती व माझे सद्गुरू श्री गुरुदेव वसिष्ठ या ठिकाणी आहेत.

येथील काही ज्योतींना नामस्मरणाची गती सापडली नाही असे मला खेदाने म्हणावे लागते. नामस्मरणातच राम प्रगट होते. तोच मी राम सर्व व्यापक असूनही अलिप्त आहे. धन्य तुम्ही मानव की सानिध्यात अनुभव घेत आहात. मी राम असताना माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी नतमस्तक होतो. ते मला पूर्णत्वाने ओळखत होते. त्याचप्रमाणे तुम्ही सेवेकरी, वाटचाल करा. पुढची दिशा फार निराळी आहे. थोडा त्रास आहे, तो सहन करा. मी सांगितल्याप्रमाणे होणारच आहे. ते झाल्यानंतर शांती मिळेल. त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल करा. हे संदेश आजच्या शुभ दिनी देत आहे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page