Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

विषय एकच आहे ©️

विषय एकच आहे ©️

श्री समर्थ मालिक – विषय एकच आहे. भक्ताने आपले कर्तव्य करणे. आत्तापर्यंत कुठला विषय बाकी आहे का? विषय नेहमीच आहे. पण ज्ञान? ज्ञाना पासून प्रकाश ! अजून काही जण प्रकाशित व्हावयाचे आहेत. एकच विषय – अखंड नाम ! ज्या आसनावरून अखंड नाम मिळाले आहे, त्या अखंड नामात सेवेकर्‍यांनी कर्तव्यात राहणे. विषय हा गहनच आहे. याच अखंड विषयावर लक्ष देणे, म्हणजे सेवेकरी बाहेरच्या वा कुठल्याही विषयाची त्याला आवश्यकता नाही.

मन हे चंचल आहे, मग भक्त कसा पाहिजे? भक्त अशा चंचल गतीचा असला तर त्याला सेवेकरी म्हटला जाईल काय? भक्त अहर्निश सत् सानिध्यात, कर्तव्यात, अखंड नामात आहे, त्याच्यासाठी सर्व आहे. असा भक्त कोण आहे का?

अखंड नाम मिळाले म्हणून भक्त नाही, तर कृती तशी पाहिजे.

मी सेवेकरी आहे, मला अनुग्रह झाला, पण ते म्हणण्यापुरते आहे. निदान म्हणू तरी नका. कर्तव्य करा. येथे कर्तव्यें दिलेली आहेत. या तत्त्वाची जो जो सेवेकरी देखभाल करील, तोच तो सेवेकरी होय ! काही सेवेकरी फक्त पाहत आहेत, आपले कर्तव्य पार पाडीत नाहीत, त्यांना सेवेकरी म्हणता येईल काय? सेवेकरी तंत्र, मंत्र, जंत्र करणारा आहे काय?

काही सेवेकऱ्यांनी तत्व नेलेले आहे. तत्व आसनावरुन मोलाचे बोल सांगत असते, ते कोणी घेतले आहे का? आसनावर तत्व आहे, मालिक आहेत. मग मानव म्हणतो, समर्थांच्या कृपेने बरे झाले………. माझ्या घरात तत्व असल्यानंतर कोणीही माझे काहीही करू शकत नाही. हाच विषय गहन आहे. मग या विषयापेक्षा विषय कुठला याच विषयावर सेवेकऱ्यांना संदेश देत आहे. आप आपल्या कर्तव्यात रहा. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page