बाबा – अविनाशी म्हणजे काय?
अलख – ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला अविनाशी म्हणतात. तोच आत्मा होय. ज्योत बाहेर पडताना हाच अविनाशी आत्मा बाहेर पडतो. तो (बाहेर) गेल्यानंतर हा देह अचेतन पडतो. अविनाशी म्हणजे सर्वस्व, म्हणजेच आत्मा होय. म्हणजेच सदगुरू होय.
आपले सदगुरू पाठीमागे असताना, सेवेकऱ्याला भीती आहे काय? म्हणजेच अविनाशी आत्मा ज्योत बाहेर पडताना अविनाशी आत्मा घेण्यासाठी मालिकच प्रत्यक्ष खडे असतात. तो कसा आहे, ह्याची प्रत्येक सेवेकऱ्याने जाणीव घ्यावयास पाहिजे. त्यांच्यात लय व्हावयास पाहिजे. त्याचा ठाव प्रत्येक सेवेकऱ्याने घ्यावा.
तो (ठाव) कसा मिळेल? तर सेवेकरी त्या वळणाने गेल्यानंतर मिळेल. आचार, विचार, उच्चार, कृती सर्वस्वी सत् (हवी)! सत् नामस्मरणात दंग (असावयास पाहिजे) ! असे राहिल्यास त्यांचा ठाव मिळेल.
सेवेकरी म्हणेल, अविनाशी आत्मा आमच्यात आहे, तर आमच्या कडून वाईट कृती का घडते? असत कार्य का घडते?
सेवेकऱ्यांचे मन वाईट कृती करीत असते. सेवेकऱ्याने बोल सत काढला तर कृती सत् होत असते. सेवेकऱ्यांची मनें त्याप्रमाणे कृती होत असते. ते कां होते? ज्यांचा सताचा नीतीमत्तेचा पाया शुद्ध आणि मजबूत असेल, तर तो घसरणार नाही. हाच पाया डळमळीत झाला, तर तो घसरतो. अविनाशी काय करणार आहे? (Contd….3)©️