Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

प्रेमसूत्र दोरी ©️

प्रेमसूत्र दोरी ©️

श्री समर्थ मालिक – प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो श्रीहरी ! कोणाला कशाचे प्रेम, तर कोणाला पैशाचे प्रेम. अशा अनेक प्रेमात श्रेष्ठ प्रेम कोणते? ते प्रेम निर्माण का होते, अन् कोण निर्माण करते? इतर मानवांना भक्तीयुक्त प्रेम, सत प्रेम का निर्माण होत नाही? तर पूर्व संचिताप्रमाणे एखाद्या मानवाला भक्ती प्रेम निर्माण झाल्याशिवाय भक्ती मार्गात येत नाही. तो योग येतो, तो त्याचे संचित आणते, अन् थेंबे थेंबे तळे साचते. त्याचप्रमाणे बहुत सुकृताचे संचित असल्यामुळे, भक्तीचे प्रेम अतोनात निर्माण होते. करावे लागते. ते प्रेम ज्या तऱ्हेने चालते, त्या तऱ्हेने भगवंत त्याच्या पाठीमागे जातात.

पूर्व संचित नसेल, तर भक्ती प्रेम निर्माण होईल काय? दुसरी गोष्ट, प्रेम निर्माण कोण करते? त्याची निर्मिती कोठून असते? मागील कर्तव्याचे फळ त्याला द्यावे लागते. त्याप्रमाणे प्रेम निर्माण होते. त्याशिवाय भक्तीचा जिव्हाळा निर्माण होणार नाही. अशा तऱ्हेने मग दर्शनयुक्त होतो. मग त्याची ती गोडी सुटत नाही. मग इतर मार्गाने ज्योत जाऊ शकेल का? मग तीच प्रेम सूत्र दोरी ज्या ज्या तऱ्हेने वळते त्या त्या तऱ्हेने भक्त आणि भगवंत वळतात. मग भक्ताच्या वेगळा हरी अन् हरीच्या वेगळा भक्त आहे का? ज्या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी सताचा वास असतो. ती गती सुटत नाही. तेव्हा त्या पात्रतेची ज्योत असल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही.

मानवाने स्वयं शक्तिने प्रेम केले आहे का? नाही, तर ते पूर्व घडणी प्रमाणे होत असते. ते प्रेम अखंड असते. हेच अखंड प्रेम आदी अंतापासून चालत आलेले आहे. आतापण तेच चालू आहे. सध्याच्या परिस्थितीत ताजा अनुभव. या दरबारात कितीतरी सेवेकरी आहेत, मग त्यांचे प्रेम सारखे आहे का? अखंड भक्तीचा जिव्हाळा हा सत् प्रेमामुळे निर्माण होत असतो. ज्याने जाणले, ओळखले त्याच्या निराळा मी आहे का? म्हणून जसे प्रेम त्याप्रमाणे देणगी, त्याप्रमाणे घडण घडत असते. ती अखंड देणगी देण्यात येते. पण सत प्रेमाचा जिव्हाळा असेल तरच ! म्हणून सूत्राची दोरी ज्या बाजूने, त्या बाजूने भगवंताला जावे लागते. कारण सत् प्रेम, सत् जिव्हाळा असतो. त्यांच्या पाठीमागे भगवंत असतो. त्यामुळे त्याला अडीअडचणी येत नाहीत. त्याचे कार्य सुलभ होत असते. (समाप्त)©️

You cannot copy content of this page