मानव त्याच्याच कृतीने भरटकला जातो. भक्ती कोणत्या तऱ्हेने व कशी करावी? जो सेवेकरी ज्ञानाची अपेक्षा करतो, विषय कोणताही असो, तो सेवेकरी समजतो व मानतो. बोल सहज सुटतात. सहज बोल असतात. त्याप्रमाणे वर्तणूक राहिली आहे काय? राखली आहे काय? का नाही राखली? ती कोणी राखावयाची? ज्ञान हे मिळत गेले. कुठून? माझ्याकडून की आसनाधीस्तां कडून? मग त्यांचे आदेश मनामध्ये, आपल्या हृदयात गाठ मारून ठेवले आहेत का? त्यांचे बोल, त्यांचे प्रणव आपल्या हृदयात गाठ मारून ठेवले आहेत का? उहापोह कुठे नाही.
आसन काही तप्त नाही. मी तप्त नाही. साधी भाषा आहे. सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य कोणते आहे? निवेदन करतील? सेवेकरी सेवेकर्याला निवेदन करण्याची पात्रता आहे काय? आद्य कर्तव्य कोणते आहे? कोणत्या तऱ्हेने कर्तव्य पार पाडले पाहिजे? एका व्यक्तीला सर्वजण शरण आहात. एकाच पित्याची लेकरे आहात. ती कशी राहिली पाहिजेत? एका वृक्षा खाली कोणत्या भावनेने बसावे? सेवेकर्यांनी सत् भक्तीने बसावे. एकरूप बसावे की वेगळे बसावे? बसला आहात का एकरूप आतापर्यंत? (पुढे सुरु…४) ©️
