आपणच आपल्या कृतीप्रमाणे देव व दानव बनतो. दानव काही निराळे नाहीत. दानव म्हणजे अहंकारयुक्त, आचार विचार नाही अशी बुद्धीहीन ज्योत होय.
स्थुलाचे बुद्धी हे भांडवल आहे, पण ती बुद्धी तेजाळलेली पाहिजे, धुरकटलेली, बुरसटलेली नको. तिला सत् शुद्ध विचारांची पावडर मारली पाहिजे. सत् शुद्ध विचारांचे घर्षण झाले तर ती तेजाळलेली राहील.
सगळ्यांचा मदमेरू मन आहे. तेव्हा मनाची भावना नि:ष्काम ठेवली तर बुद्धी पण नि:ष्काम होईल. ज्याला तुम्ही शरण आहात, ते दृश्य आहे. तुम्ही दृश्य आहात. ते दृश्य जर समोर नसेल तर अदृश्य येई़ल कोठून? दृश्यच गतिमान होत असते आणि पांडुरंगाला पाहत असते. याच्या मुळाशी सद्गुरु कृपा आहे. दृश्याच्या ठिकाणी आपण सद्गुरूंची स्थापना करीत असतो. त्यांनी दिलेला नामाचा उजाळा करणे. अशा तऱ्हेने नि:ष्काम गतीने गेले तर सर्वस्व होईल. पण ते स्थूल सत् शुध्द विचाराने गेले पाहिजे. असत विचारांपासून आपण दूर राहिले पाहिजे. अशा विटाळाच्या ज्योती असतात. तेव्हा अदृश्य संपत्तीचा नाश तुमच्याच कृतीने होतो. मग सर्वस्वी नागवला जातो. (२)©️