आपल्या दरबारात मायावी ज्योती येतात. आपण म्हणतो की, कर्मसंचित दूर ढकला. तसे नाही. एवढ्या योनीत ढकलले तर, ते आणि हे असे द्वय कर्मसंचित भोगावे लागते. आपले सेवेकरी आजारी असतात. ते कर्मसंचित पुढे ढकलता येणार नाही. पुढे ढकलले तर द्वय संचित भोगावे लागेल. यापेक्षा जे आहे ते तू भोग. जर दूर करावयाचे असेल, तर अखंड नामात दंग हो ! धुतल्या तांदळा सारखा शुद्ध रहा. नामामुळे शुद्ध होशील. मी–तू पणा, अहंपणा सर्वस्व विसरशील ! नंतर मालकांची जाणीव मिळेल. शेवटी त्यांच्यात लय होशील. आपले सेवेकरी अंती विव्हळता कामा नये.
प्रत्यक्ष अखंड नाम, माझे सद्गुरु यांच्यात लय झालात, तर किती चांगले होईल. प्रत्येकाने ओळख ठेवा. सत् मार्गाने चला. कष्ट करावयाचे अगोदर फळाची इच्छा केल्यास ते फळ दूर जाते. मी कष्ट करीन, फळाची इच्छा करणार नाही. अशा तऱ्हेने ज्योत जाईल, तर काय होईल?
अखंड नामात सद्गुरु आहेत. ते नामस्मरण मनापासून न केले तर भीती वाटते. ही ज्ञानाची मूर्ती कशी आहे, याची पाहणी करा. चांगल्या रितीने वागा. याचेपुढे तरी निदान आसनाधिस्तां बरोबर बनवा बनवी करु नका. त्यांना सर्व माहित असते. ते चार माणसांत उघड करणार नाहीत. झालेली चुक कबुल करणे. (३)©️
(समाप्त)