Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

चमत्कार म्हणजे भक्ती नव्हे ! ©️

चमत्कार म्हणजे भक्ती नव्हे ! ©️

श्री समर्थ मालिक – चमत्कार म्हणजे भक्ती नव्हे. अघोर मानवांसाठी चमत्कार करावे लागतात. आपल्या भक्तीसाठी भुरट्या चमत्कारां सारखी आवश्यकता नसते, तर अखंड चमत्कारांची आवश्यकता आहे. हे चमत्कार पाहिजेत, झाले पाहिजे असे म्हणण्याची आवश्यकता नाही. चमत्कार आपोआप होतात. सेवेकऱ्यांची थोडी पाहणी करावी लागते. अघोरांना काही माहीत न पडता गुपचूप कार्य करावयाचे होते. त्या अघोरांकडून भरपाई करून घ्यावयाची होती. म्हणजे त्या मानवाचे कर्तव्य करण्यास मला विलंब लागत नाही.

कोणतेही फळ देताना अनंत वेळ विचार करावा लागतो. तदनंतरच ते फळ दिले जाते. फळ दिल्यानंतर ते परत घेताना अनंत वेळ विचार करावा लागतो. फळ दिले तर ते घ्यावे कोणत्या हेतूने, त्यासाठी पूर्वजन्मीचे संचित बघावे लागते. देताना सोपे पण घेताना विचार करावा लागतो. म्हणून कोणतेही कर्तव्य करण्याला विलंब लागतो. यामुळे विचार निर्माण होतात.

आमचे दोघांचे (सद्गुरु आणि सत् ) वादविवाद होतात, पण आमचे वादविवाद कोणालाही कळणार नाहीत. आमचे वादविवाद जरी झाले, तरी आमचा अबोला राहणार नाही. हे कर्तव्य वादविवादाने केले जाते, होत असते. त्याप्रमाणे कर्तव्याची दिशा आखली जाते.

या आसनाच्या सेवेकऱ्यांच्या पूर्व संचिताप्रमाणे भक्तीचे मूळ अखंड तिजोरी पदरात टाकली असताना सुद्धा त्याला सांभाळता येत नाही. कोणी कशासाठी रडतो, तर कोणी कशासाठी रडतो, पण सद्गुरु सर्वस्व पहात असतात. सेवेकरी ठाम पाहिजे. ध्यानधारणा पाहिजे. त्याला मागणी करण्याची आवश्यकता नाही. स्वतःचे मनावर ताबा ठेवता येत नाही, मग बाकीचे काय करणार? (समाप्त) ©️

You cannot copy content of this page