नंतर ज्या पदाला शरण आहात, तेथे पूर्ण लक्ष देवून, तेथून ज्या नामाची जाणीव, त्यात गुंग होणे, यालाच म्हटले आहे, उपवास !
हल्लीचे मानव तसे नाहीत. सर्व ठिकाणी एकच माऊली वास करते. पण प्रकृतीचे ढंग केव्हाही जाऊ शकणार नाहीत. प्रकृतीच्या अंगाने पाहुर लागल्यास वितंड वाद होऊ लागतात आणि संता संतात सुद्धा पुढें बोलणे नको. माझी इच्छा संत पंढरीतच यावेत अशी मुळीच नाही. येथे न येता सुद्धा विठ्ठलाच्या विठ्ठलाचेही दर्शन घेऊ शकते.
मात्र असे कोणी केले आहे का?
मानवाला शांती मिळत नाही. चित्त लागत नाही. आषाढी एकादशी आली आहे म्हणून पंढरीला येण्याचा प्रयत्न करतात.
हल्लीच्या एका तरी संताने खऱ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे का? आहे जर म्हणावे, तर इथपर्यंत येण्याची गरज नाही. नामदेव, तुकाराम इत्यादींना ज्या चरणांचे दर्शन झाले, त्यालाच विठ्ठल, पांडुरंग, राम, कृष्ण म्हटलेले आहे. आत्ताचे संत इथपर्यंत पोहचलेले नाहीत. हा सर्व मायेचा पसारा आहे. एकही संत, एकही साधू निष्काम भक्तीने येथे आलेला नाही. ©️
(समाप्त)