Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

अवतार दिन…!©️

अवतार दिन…!©️

श्री राम नवमी – माझा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यासाठी जन्म अवतार नटवलेले तत्त्व ते मीच आहे. मला जी कर्तव्य सांगितली, ती करीत करीत मी लयबद्ध झालो होतो. सताला पूर्णत्वाने संरक्षण देणे व असताचा नि:पात करणे, हिच भूमिका घेऊन सर्वस्वाला सांभाळीत, ज्याच्यासाठी जन्म अवतार नटवला त्यांचा मानवी कर्तव्याप्रमाणे नि:पात केला.

या भारत भूमीमध्ये, माझा उत्सव मानव मोठ्या आपुलकीने साजरा करत असतात. असे जरी असले तरी मला सुद्धा कोणी सूत्रधार आहे, हे मानवाने लक्षात ठेवावे. असे जे अनंत आहेत, त्यांच्या आदेशाशिवाय झाडाची पानेही हलत नाहीत. असे जे सूत्रधार ते आपले सूत्र अदृश्यपणे हलवित असतात. पण दृश्य तत्त्वाला त्याची जाण असावी लागते, जी त्यांना नसते.

त्याप्रमाणे मी माझे कर्तव्य सत या चाकोरीतूनच केले आहे. रथी महारथी या आसनाजवळ लयबद्ध आहेत.

जसे अवतार कार्य तसे या आसनावर प्रगटीकरण होत असते. या आसनाचा ना अंत ना पार असे हे आसन आहे. वशिष्ठ गुरुदेव हे माझे सद्गुरु आहेत. त्यांचेही सद्गुरु आहेत. असे हे महान आसन आहे. ©️

You cannot copy content of this page