भक्ती करणे दुरापास्त आहे. ती कोणाला ठसली जात नाही. ठसली तरी अडीअडचणी निर्माण होतात. पण पूर्वजन्मीचे गाठोडे असेल तर तो त्याची पर्वा करीत नाही. आपली चाकोरी सोडत नाही.
हल्लीच्या परिस्थितीत गती मिळणे, चाकोरी मिळणे दुरापास्त झाले आहे. आयुष्य घालवेल पण सत्य परिस्थिती बाजूला राहीली.
आपल्या येथे अजमावले जाते, सांगितले जाते, तसे कुठेही सांगितले जात नाही. येथे बिलगलेल्या ज्योती भाग्यवान आहेत. पूर्व प्रारब्धानुसार सत् सानिध्य मिळाले आहे. ते टिकविणे सेवेकऱ्याच्या कर्तव्यावर अवलंबून आहे.
मनुष्याचे जीवन जगणे हल्लीच्या परिस्थितीत फार कठीण आहे. नसेल ते विघ्न उभे राहते. तशातून सेवेकऱ्याला अडीअडचणी बाजूला करून वेळ गाठावी लागते. तात्पर्य – ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्याला त्याला मिळते. जशी सेवेकऱ्यांची ओढण, जशी वाटचाल त्याप्रमाणे त्याला फळ द्यावे लागते. मात्र फळाच्या आशेने जो सेवेकरी असतो, तो मात्र आपल्या भांडवलाला मुकला जातो. आशा न धरता निष्काम भावनेने सेवा केली तर मालिक कोड कौतुक पूरवितात. म्हणून आशेने कोणतीही गोष्ट करू नये असे सांगितले जाते. (समाप्त)©️