Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

अंगी लिनता, मनी अभिन्नता, मुखी त्याचे नाम, तोच बीजदाता….©️

अंगी लिनता, मनी अभिन्नता, मुखी त्याचे नाम, तोच बीजदाता….©️

सेवेकऱ्याच्या, भक्ताच्या अंगी लिनता असली पाहिजे. जो खरोखरीच लिन झाला आहे, त्याला तहान, भूक, मान, अपमान काही नाही, असा सेवेकरी झाला, मग मात्र त्याला मी जवळच आहे. मग बीजदाता कोण आहे, ते त्याच्या हाती बरोबर मिळेल. असा जर बीजदाता सापडला, तर उपरी बीजाचा उपयोग होईल काय? अशी बीजे निर्माण झालेली, जातात किती आणि येतात किती, पैदास होतात किती आणि लय होतात किती? म्हणूनच आपण एक समर्थांचा कण आहोत, असे समजून चालावे. आपण कोणत्या ठिकाणी जावे, कसे राहावे, समर्थांच्या ठिकाणी लय व्हावे कि आणखी जन्म घ्यावेत याची खूणगाठ तुम्हाला मिळणार नाही, पण मानव जन्म मात्र हक्काने मिळेल. यासाठी सत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, हे संदेश आहेत.

एका बीजापासून किती उत्पत्ती होते हे तुमच्या नजरेसमोर आहे. मुळात बीज कोठून आले आहे, कोणी फेकले आहे, याची माहिती आपणाला मिळाली आहे का? मग बीजदाता किती लांब आहे, किती अंतरावर आहे?

बीजात मीच आहे. स्थूल, सुक्ष्म, कारण, महाकारणातही मीच आहे. अचेतनातही मीच आहे. मला आदि, अंत, मध्य काहीही नाही. त्या पात्रतेचा भक्त असेल तर मला कोठेही पाहू शकतो. भक्त हा सतशुद्ध पाहिजे नाही का? मग गप्पा मारून, टिंगल टवाळी करून, खवचट बोलून, अशा अनेक तऱ्हेने तो भगवंत मिळेल का? गुरुबंधूंचे नाते फार कोवळे आहे आणि नाजूक आहे. हे एकाच मालकांचे कुटुंब आहे. एकाच पित्याची लेकरे आहेत. अशा तऱ्हेने वर्तणुक ठेवलीच पाहिजे. एका मातेच्या लेकराप्रमाणे वर्तणुक ठेवली पाहिजे. गुरुबंधू भगिनींचे नाते असे आहे की, तो आपणाजवळ काहीही मागणार नाही. फक्त तुमची प्रेम आणि आपुलकी मागणार. माझा गुरुबंधू कसा आहे, कसा नाही हे पाहण्यासाठीच तो जवळ येतो. म्हणून शुद्ध स्फटिकासारखी वर्तणूक ठेवा. या संदेशाप्रमाणे चला. जे महान तत्व (नाम) दिले आहे, त्याचा उजाळा करा. हेच संदेश आहेत. ©️

You cannot copy content of this page