आपण सेवेकरी आहोत. आपण किंवा इतर मानव ज्योती काय करणार आहोत? सेवेकऱ्यांने एकच अर्पण करावयाचे, जी अखंड भक्ती, तिच मालकांच्या चरणांवर ऋजू होते. दुसरे काय अर्पण करणार? मालिक कशाला भुकेलेले आहेत? एकच अखंड नाम! सत् भक्ती तिच करावयाची असते.
आपले सेवेकरी काय म्हणतात, “मी सर्वस्व अर्पण केले आहे!” असे जर आहे, तर सांगण्यास तरी काय आधार आहे? आपण अर्पण कोणाला करतो? अर्पण करणारे कोण? मालकांना एकच अर्पण करावयाचे – सत् भक्ती! नामात दंग, सत् चाकोरी, सत् वळणे अंगी पडतील, तेच पुष्कळ आहे.
सत म्हणजे काय?
याचाच ठाव घ्यायचा आहे. सत सतात लय झाल्यानंतर बाकी शिल्लक राहिल काय? असे मनाने ठाम, शुद्ध होण्यासाठी एकच उपाय! जे नाम त्याचा उजाळा करावयाचा असतो. त्यामुळे सर्वस्व भावना, नाहीशा होतील. जे ऐकता, जी वळणे, जे कार्य, हुकुम, आदेश त्याप्रमाणे वागावयाचे! एवढेच ज्योतीला माहीत असते. त्याप्रमाणे वागणे. सताचा पाया मजबूत असेल, तर भिती नाही. मजबूत नसेल तर ती ज्योत घसरते.
ध्यानधारणा, नामस्मरण करताना एकच करायचे, असत वातावरण नाहीसे करुन, शुद्ध व्हावयाचे असते. (पुढे सुरु…..२) ©️