देवाचिये द्वारी उभा क्षणभरी !
तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!
मानवाला चार अंगे आहेत - स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण ! या चारही देहातून तो उद्धार करू शकतो. केव्हा? तर ज्या ठिकाणी शरण जायचे, त्या ठिकाणी तो पूर्णत्व शुद्ध पाहिजे. द्वैत भावना, संशय, कल्पनारहित जो असेल तोच सत् पाहू शकेल, इतरांस तो अधिकार नाही.
हल्लीच्या मानवांनी याचे विवरण केलेले दिसत नाही.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! याचा अर्थ असा नव्हे की, गळयात माळ घातली की तो गुरु झाला. मग त्याने पंढरीला जाण्यास सांगावे आणि विठ्ठलाच्या दारी जाऊन, तेथें उभे राहून आळवण्यास सांगावे. परंतु पंढरीतच देव आहे का? पंढरीला गेल्यानेच देव भेटतो कां? तर असे नाही.
पंढरीच्या विठ्ठलाचे तत्व सताने निर्माण करून येथे कार्याकरीता पाठविले आहे.
जर विठ्ठल मानवाला मोक्षाप्रत नेऊ शकेल असे जर आहे, तर नामदेवांना गुरु करण्याची आवश्यकता का भासावी? तर मोक्षाप्रत जाण्यासाठी श्री गुरू, सद्गुरु माऊली हेच सर्वस्वाचे निधान आहे. हेच सर्व ठिकाणी व्यापून अलिप्त आहेत..... पुढे सुरु ©️