“मंत्र म्हणजे मन त्रयीत लय करणे – येणे नाम मंत्र !” मन त्रयीत लय झाले म्हणजे मंत्राची सिध्दी होते. पण त्यालाही समर्थांचे सहाय्य लागते. सद्गुरू शिवाय मन त्रयीत लय करणारे कोणीही नाही. मन त्रयीत लय झाले तरच ते सिध्द होते. त्याला ओंकार बीज लागते. त्याशिवाय मंत्राची पूर्ती नाही.
मंत्र म्हणजे काय? त्याचे माहेरघर हेच समर्थ माऊली आहेत. ओंकार बीज लावल्याशिवाय कोणता तरी मंत्र आहे का? आज एकाच गणपतीची किती नांवे आहेत. तोच गणपती किती रूपाने नटलेला आहे. त्याच्या ध्यानात निमग्न राहण्याची आमची इच्छा आहे.
या ऋद्धी सिद्धीने मला अभिमान वाटला होता. त्यामुळे माझे नुकसान मी करून घेतले. तरी येथून पुढे आपण मला याबाबतीत डिवचू नये ही विनंती आहे. सत् सानिध्याची ओळख असताना सुद्धा या ऋद्धी सिद्धी मुळे मला अहंकार निर्माण झाला. त्यामुळे सताची ओळख विसरून वितंड वाद निर्माण झाला. मग मला प:श्चाताप झाला. नंतर मी माझ्या समर्थांचे ध्यान केल्यानंतर स्थिर झालो. मन हे कोणत्या खड्ड्यात घालील याचा अंत नाही. सताचे सानिध्य असताना मंत्राच्या नादी लागले तर वहावत जातो. मी वहावलो. पण त्यानी मला ठिकाणावर आणले. (पुढे सुरु…..२)©️