बाबा – प्रारब्ध घडते ते मानवाच्या कृतीमुळे घडते. म्हणून आपल्या कृतीची फळे आपल्याला भोगायला लागतात. येणे नाम प्रारब्ध / संचित. म्हणून विचार सत पाहिजेत. सत् शुध्द गतीने गेले पाहिजे. कर्तव्य सत झाले तर इहात आणि परात पण शांती मिळेल.
संचित घडविणे तुमच्या अधीन आहे. मागे झाले ते झाले. पण आता सानिध्यात आल्यानंतर चांगली फळे निर्माण झाली पाहिजेत. मागे जे घडवले ते कार्य तुम्ही तुमच्या स्वयं गतीने नाश करू शकता. सत गतीने नामस्मरणाने सर्वस्व होते. तुमच्या सत कृतीने तुमचे असत संचित नाहीसे होते. समर्थांबरोबर आतबाहेर केले की आटोपला कारभार. जी सतमय झालेली ज्योत असते ती म्हणते, “जरी चुकले नसले तरी मालिक चुकले माझे.” मग मालिक पण त्याची नोंद करीत नाहीत.
अविनाशी तत्व तुमच्यात वास करीत आहे. आतून बाहेरून सतमय झाल्यानंतर मग काही नाही. पण मन स्थिर होत नाही. मन अखंड नाममय असेल तर त्याला कोणीही हेलकावणार नाही. नाममय असेल तर त्याला लाघवी चकवणार नाही. मन नाममय असेल तर त्याला सताचा ध्वनी सतत मिळतो. ©️