सत चरणांचा अंत घ्या. चरण सापडले की पुढे वाटचाल आपोआप सुकर होईल. काही सेवेकऱ्यांना चरण सापडलेले नाहीत. चरण सापडले तर इतर कर्तव्यांची आवश्यकता काय? मग त्यांच्या लिलेचा अंत घेण्याची गरज काय? घेऊ म्हटले तर घेऊ देत. म्हणून पूर्वजन्मीच्या अनुसंधनाने कर्मसंचिताप्रमाणे कर्तव्याची घडण सत् तर आता ही सत् ! म्हणून पूर्व कर्माप्रमाणे घडण म्हणून या सानिध्यात…
श्री समर्थ मालिक – मी नाही आकाशी, मी नाही पाताळी ! इतकेच की भक्त त्या पात्रतेचा असेल तर, निष्काम, परिपूर्ण, सत स्फटिकासारखी वर्तणूक असेल, तर मी त्या भक्ताला दूर नाही. आकाशीपण नाही आणि पाताळीपण नाही, तर मला सानिध्यात पाहता येईल, असे काही भक्तांनी सुद्धा सांगितले आहे. मी कोठे नाही असे ठिकाण नाही. इतकेच आहे की…
श्री स्वयंभू – मी त्रिगुणातीत असणारे एक तत्व आहे अन् अखंड तत्त्वाचा सेवेकरी, त्यांच्या चरणाचा एक कण आहे. जे स्वयमेव तत्व आहे की ज्याला कधीही खंड नाही. त्याला रात्र नाही आणि दिवसही नाही. वेळ काळ काही नाही असे जे परम तत्व आहे, त्या तत्त्वाच्या चरणांजवळ मी एक कण आहे. त्रिगुण तत्वे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश…
श्री समर्थ मालिक – दिसते ते नसते, अशी जर कल्पना असेल तर पुनर्रपी जन्माला कोण येते? पाच तत्वांचा हा देह आहे. मग नसते काय? अन् अमर राहते काय? हा दृश्य अदृश्याचा खेळ आहे. प्रकृती अंग नटवले तरी, प्रकृतीला कोणत्यातरी निमित्ताने मी त्यागतो. पण कोणाच्या प्रेरणेने, याची गती प्रकृतीला मिळत नाही. भक्ती मार्गाने ज्योत गेली तर…
श्री विठ्ठल - आम्ही अवतार कार्य घेतो, ते कशासाठी? आदेशाशिवाय आम्ही अवतार कार्य घेतलेले नाही. सताचा नाहक छळ झाला म्हणजे, अवतार कार्य होते. म्हणून सर्वांना उत्पन्न करणारा, तारणारा सर्वभूतेषु पश्य एकच तत्व आहे, त्यांचेच आपण सेवेकरी आहोत. मी तू एकच आहे. फक्त नवा अन् जुना एवढाच फरक आहे. ज्या तऱ्हेची ज्योत त्याप्रमाणे अधिकार अन् त्याप्रमाणे…
श्री विठ्ठल – या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे. लिनता, नम्रता, शांती आहे. “देही देखीली पंढरी | आत्मा अविनाश विटेवरी ||” असे एका संताने म्हटले आहे. त्याने प्रत्यक्षातही अनुभवले आहे.
ज्या ठिकाणी शांती आहे, तेथे तत्त्व असणारच. जेथे तत्त्व आहे, तेथे शांती आहे. शांती हीच रुक्मिणी आहे. याच्यापेक्षा महान शक्ती आहे तिला महामाया म्हणतात.…
तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला तरी त्याने आपल्या कर्तव्याला पाठ दिली का? तो आपल्या नादातच होता. कधी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का? मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी होईल, त्यावेळी त्याला कळेल. जो मेणापेक्षाही मऊ सेवेकरी आहे, त्यालाच…
श्री समर्थ मालिक – मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे | मऊ मेणाहूनी म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ असा सेवेकरी कोण होता? संत तुकाराम मऊ होऊनच वज्रापेक्षा कठीण असणाऱ्या तत्वाला म्हणजे प्रकृतीला, कष्ट मिळाल्यानंतर भक्ती कठीण आहे असे त्याने सांगितले. म्हणून वज्रापेक्षाही कठीण असले तरी लवचिक कसे होते, कसे करावे हे तुकोबाला माहित होते…
मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ – जोपर्यंत स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळत नाही, तोपर्यंत मोक्ष नाही. स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळणे हीच मुक्ती आणि हाच मोक्ष आहे.
प्रथम भक्ती श्रेष्ठ ! त्यात त्याला मुक्ती मोक्षाची गती नाही. सूक्ष्माची गती सद्गुरु देतात. मग तो सूक्ष्मात तल्लीन होतो. त्याचे सूक्ष्म त्याला दिसते. त्याच्यात रममाण झाल्यानंतर – कारण, महाकारण येथपर्यंत…
श्री समर्थ एकचित्त – सृष्टी नियमाप्रमाणे जी घडण घडावयाची असते, ती घडवून घ्यावी लागते. कार्य चालू आहे. कालगतीप्रमाणे थोडे मागे पुढे होते, त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट झाले, तर वाईटातून सत् प्रेरीत बीज बाहेर पडते. वाईट कृत्य दिसायला दिसते, पण त्यातूनच चांगले पैदास होऊन बाहेर पडते. कोणतीही घडण घडविण्यासाठी…
श्री समर्थ मालिक – सेवेकरी दरबारात व दरबाराच्या बाहेर कसा वागतो? तर दरबारात घाबरतो व बाहेर घाबरत नाही. सेवेकरी येथे धीट व बाहेरही धीट पाहिजे. तो म्हणतो, बाहेर तरी मला कोण बोलणार आहे?
येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम…
पांडवां सारखे जीव:श्च कंठ:श्च दुसरे कोणी नव्हते. त्यांच्यासारख्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झळ लागली. ती त्यांनी सहन केली. त्यानंतर कौरवांचा नाश करण्यात आला. हे का? कौरव पांडव हे नातलगतच होते. कौरवांची बुद्धी सात्विक का झाली नाही? का होऊ शकली नाही? ज्यांची कृती सात्विक असेल तरच ते सात्विक होतील.
कौरवांची भावना शुद्ध नव्हती म्हणून वृत्ती…