Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

आकार आणि निराकार काय दूर आहेत कां? ©️

आकार आणि निराकार काय दूर आहेत कां? ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी जसा पाहील तसा त्याला अनुभव देणे. त्या तऱ्हेने सेवेकऱ्याने पाहिले असेलच. असे कोणी पाहिले आहे का? सेवेकर्‍याची मनोबुद्धी जशी जाईल तसा त्याला अनुभव द्यावा लागतो. इतकेच की, मन शुद्ध सात्विक स्फटिकासारखे मात्र पाहिजे, मग त्या ठिकाणी त्याचे सूक्ष्म खडे असते.

ध्यान कोणाचे करावे? तर आपल्या सद्गुरूंचे हे त्याने ओळखावे. मी कसा आहे कळणार नाही. आकारी आहे की निराकारी आहे? निराकारी आहे, तर प्रणव निघतात कुठून? बोल निघतात कुठून? मग आकारातच मी आहे, अन् आकाराच्या रहितपण मी आहे. म्हणून प्रथम काय आहे, कशासाठी आहे, काय करावयास हवे हे सद्गुरु दाखवितात. पण सेवेकर्‍याची भ्रमंती असते. ती दूर करून गती जरी दिली तरीही हे सत्य आहे का मिथ्य आहे? पाहतो आहे खरे, असे दिसत आहे. प्राकृत दृष्टीने पाहता येते.

इतकेच की, सेवेकऱ्यांनी त्या तऱ्हेने कर्तव्याची दिशा वाढवीत नेली की हे सुद्धा कळेल. यासाठी काय करावयास हवे? तर नामस्मरण! नामस्मरण करने हे आपले आद्य कर्तव्य आहे ह्याची जाण ठेवून जर कां सेवेकरी आपले नामस्मरणाचे कर्तव्य करु लागला मग आकार आणि निराकार काय दूर आहेत कां? (समाप्त) ©️

You cannot copy content of this page