श्री नर्मदा निवासी मालिक – सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये सत किती आणि असत किती प्रमाणात आहे हे आपणास पूर्ण माहित आहे अन् याचा उहापोह मागे केलेला आहे. आजच्या परिस्थितीत सतावर पुष्कळ दडपण आहे, तरी सुद्धा कर्तव्य होत आहे. म्हणून पुष्कळ त्रास होतो. आता थोडे दिवस बाकी राहिले आहेत. मग आपणास कळेल कुणाची बाजू सरस आहे ते.…
श्री समर्थ मालिक - मोहाला बळी पडणाऱ्या ज्योती पुष्कळ आहेत. सत्यासाठी जगणाऱ्या ज्योती व्यासपीठावर अजून उभ्या राहिल्या नाहीत. त्यांना कोणी पुढे येऊ देत नाही. याला कारण अघोर आहेत. ज्योत अघोरांच्या ओंजळीने पाणी पीत आहे. होते ते चांगल्यासाठी होते. आपल्या आदेशाप्रमाणे हिला संरक्षण दिले होते. या पदावर आलेल्या ज्योती यातच गुरफटून जातात. त्यांना मोह निर्माण होतो.…
कलियुगाचा मध्य उलटला आहे. काहितरी घडणारच आहे. गती घेण्याचा काळ अगदी समीप आला आहे. ज्या वेळेला कर्तव्य परायणता होईल, त्यावेळेला पूर्णत्वाने संदेश मिळतील. दिले जातील. चिंता करावयाची नाही. सत्य म्हटले तर हे कलियुग आहे. सत आहे. ते सत् तरी कशावरून?
कोकणात पडलेले आसन हे चमत्काराने नटलेले आसन आहे हे सत्य समजा. दंडकारण्यात सर्वत्र अघोरी…
श्री समर्थ मालिक - प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. त्यांच्या पूर्व संचिताप्रमाणे जे लागेबांधे आहेत, ते श्रेष्ठ आहेत. हे नाते अखंड आहे. अखंड पद आहे. ८४ लक्ष योनीत जरी सेवेकरी भटकला तरी सद्गुरु पदाचा ठाव घेण्यासाठी त्याला पुन्हा मानव जन्मात पाठवितात.
सद्गुरूंच्या मुखातून मिळालेले अमृततुल्य प्रणव जतन करणे हे सेवेकऱ्यांचे महान…
श्री समर्थ मालिक - एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. आपण मानव आहात. संशयात, षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटले आहात. या सर्वस्वातून सुटका करणारे, एक महान श्रेष्ठ पद आहे. तेच हे गुरुपद आहे. त्या गुरुपदाशिवाय सेवेकऱ्यांना वाचविणारे, तारणारे, त्यांचे कोडकौतुक पुरविणारे दुसरे कोणीही नाही. सद्गुरु आणि सेवेकरी यांचे नाते संबंध फार निराळे आहेत, वेगळे आहेत. आपल्या सेवेकऱ्यांसाठी ते हेलावतात.…
श्री समर्थ मालिक - पूजा करताना कोणीही घाबरण्याची आवश्यकता नसते. ती करताना शांत विचार ठेवूनच करावी. कोणत्या हाताने पूजा करावी हे लक्षात ठेवा. अशावेळी चूक म्हणणे योग्य नसते. प्रेम भावनेने केलेली पूजा मान्य करून घेणे असते.
सेवेकऱ्यांचे हे ठिकाण पवित्र अन् सेवेकऱ्यांचे कर्तव्य हे पवित्र, हे येथील सेवेकर्यांनी समजावयास पाहिजे. कोणत्याही…
रुक्मिणी माता – (आषाढी एकादशी) परब्रम्ह तत्त्वाच्या (आपण ज्यांना परब्रह्म म्हणता) याच ठिकाणी माझी मान लवते, त्यांनी (विठ्ठलांनी) सुद्धा मान लवविली, मग परब्रह्म कोण? म्हणून माझे कर्तव्य मी करीत आहे. पण एवढेच आहे, जे सर्व भूतेषु पश्य ते सर्व ठिकाणी व्यापक असून सुद्धा अलिप्त आहेत. याची गती मिळण्यासाठी, कोणाची तरी साथ हवी असते. साथ मिळाल्यानंतर…
श्री समर्थ मालिक – विषय एकच आहे. भक्ताने आपले कर्तव्य करणे. विषय नेहमीच आहे. पण ज्ञान? ज्ञानापासून प्रकाश ! अजून काही जण प्रकाशित व्हावयाचे आहेत.
एकच विषय - अखंड नाम ! ज्या आसनावरून अखंड नाम मिळाले आहे, त्या अखंड नामात सेवेकर्यांनी कर्तव्यात राहणे. विषय हा गहनच आहे. याच अखंड विषयावर लक्ष देणे, म्हणजे सेवेकरी…
श्री विठ्ठल - मन गढूळ होते कारण हा संसार आहे ना? एका भक्ताने म्हटलेले आहे, “मन गया तो जाना दे | मत जाना दे शरीर || ना खेचेगा कमान | तो कहा से लगेगा तीर || मी त्याचे शेले विणले ते का? चोखोबा संगे ढोरे ओढली, जनाची लुगडी धुतली याची कारणे कोणती? मग आताच्या सेवेकऱ्यांची…
ज्या वेळेला दहा इंद्रिये एकत्र करून अकराव्यात तल्लीन झाला, स्व: स्वरूप प्रगट झाले त्याच स्वरूपाच्या ठिकाणी पूर्णत्वाने निमग्न झाल्यानंतर त्यालाच समाधी म्हणतात. अशी गती मिळाल्यानंतर देव पहावयासी गेलो | देव होवोनची ठेलो अशी गती मिळते. मग सांगा पंढरीत विठ्ठल आहेत का कुठे आहेत?
आपल्याच हृदयी सद्गुरूंचा वास आहे. मन रानोमाळ भटकण्याची आवश्यकता काय? परंतु…
श्री विठ्ठल - जे मागायचे ते मागत नाहीत, म्हणून मला त्यांना लवकर दर्शन द्यावे असे वाटत नाही. एकही भक्त सत् भक्तीत रममाण नाही, जर रममाण झाला असता तर मला गाठ घेण्याची आवश्यकता वाटली असती. आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे.
मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन…
श्री विठ्ठल - जे मागायचे ते मागत नाहीत म्हणून मला त्यांना लवकर दर्शन द्यावे असे वाटत नाही. एकही भक्त सत् भक्तीत रममाण नाही, जर रममाण झाला असता तर मला गाठ घेण्याची आवश्यकता वाटली असती. आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे, मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन केले…