Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची तऱ्हा साध्य होणार नाही, साध्य होऊ शकणार नाही. पण …

पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होते? तर ज्ञानमार्गामुळे मिळतो. स्वयंम प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या …

मी मनातच समर्थांना बोल दिले. ”मालिक आपणच माझी लाज राखलीत.” पुनश्च काही दिवसानंतर सर्व सेवेकरी मालाडला आले अन गळ घालू लागले,”तुम्ही सर्वांना …

दरबारची सुरुवात कशी झाली…. प्रत्यक्ष सद्गुरु मुखातील प्रणव !!! अनंतांच्या संदेशानुसार ॐकारांनी पंचवीस अवतार कार्य नटवली. परंतु ॐकारांच्या पाठीमागे अनंत होते. सर्व …

अनंतांनी संदेश दिले, आम्हाला संदेश मिळाले, पूर्वी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की हे अनंतांचे संदेश आहेत. प्रथमावधित गुरुदेव वशिष्ठ देखील प्रगट …

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।। आपले सद्गुरु जे आपल्याला सांगत असतात त्याची छाननी करणे, उजळणी करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य …

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

पाचवा प्रणववेद सिद्ध होण्यासाठी…©️

पाचवा प्रणववेद सिद्ध होण्यासाठी…©️

पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची तऱ्हा साध्य होणार नाही, साध्य होऊ शकणार नाही. पण पाचवा प्रणववेद सिद्ध होण्यासाठी, सापडण्यासाठी भक्ताने वा सवेकऱ्याने काय केले पाहिजे? नामस्मरण! मनाने झटले पाहिजे. सेवेकरी नामस्मरण करतोच आहे आम्ही नाही असे म्हणत नाही, पण नामस्मरण कसे केले पाहिजे?

नामस्मरण हा एक प्रकारचा नाद आहे. तो नाद असा असला पाहिजे की तो पार ब्रम्हानंदाप्रत घेऊन गेला पाहिजे. त्या अनंतांच्या कानापर्यंत त्या नामस्मरणाचा नाद पोहोचला पाहिजे. ती नामस्मरणाची ओढण ॐकारांप्रत पोहोचली पाहिजे.

लक्षात घ्या ध्यानधारणेकरीता आसन आहे. अर्थात ध्यानधारणा आसन घालून करता येते, पण नामस्मरण करताना इकडे, तिकडे लक्ष जात असेल तर ते नामस्मरण काहीही उपयोगाचे नाही. नामस्मरण मुखाने चालू असताना, नेत्र आपले काम करणार, कान आपले काम करणार! म्हणून नामस्मरण करताना नाम अशा तऱ्हेने घेतले पाहिजे की कानांना फक्त नामाचाच ध्वनी ऐकायला यायला हवा. बाहेरचे इतरत्र ध्वनी कानावर येताच कामा नयेत. नेत्रांसमोर केवळ सद्गुरूंची छबी तरळली पाहिजे. असे झाल्यानंतर डोळे आपोआप स्थिर होतील. पापण्या जराही हलणार नाहीत. मग ते नाम अन ते ध्यान! दोघांची संयुक्तता साधली अन त्यात स्थिर झाले मग नाद वरपर्यंत येणे ब्रह्मानंदाप्रत पोहोचतो. अशा तऱ्हेने या चाकोरीतून एकदा का सेवेकरी उर्ध्वतेने वाटचाल करू लागला तर आम्ही खात्रीने सांगतो पाचवा प्रणववेद प्रगट होणारच. पण पाचवा प्रणववेद प्रगट होण्यासाठी सद्गुरु दर्शन हे आवश्यक आहे. सद्गुरु दर्शन ही सर्वात प्रथम पायरी. सद्गुरु दर्शनानंतर सूक्ष्म गती ही पुढची पायरी. ©️

You cannot copy content of this page